वस्तू वास्तू नाती - मराठी कविता

वस्तू वास्तू नाती, मराठी कविता - [Vastu Vaastu Nati, Marathi Kavita] वस्तू जुन्या होतात असून अडचण नसून खोळंबा होतात.

वस्तू जुन्या होतात असून अडचण नसून खोळंबा होतात

वस्तू
जुन्या होतात
असून अडचण
नसून खोळंबा होतात
भिगडल्या तरी
रिपेअर करता येतात
जुन्या झाल्या तर टाकून देता येतात

वास्तू
जुन्या होतात
असून अडचण
नसून खोळंबा होतात
रिपेअर केल्या तरी
त्रास देतात
नवीन घ्यायच्या तर
महाग पडतात

नाती
जुनी होतात
असून अडचण
नसून खोळंबा होतात
तोडता येत नाहीत म्हणून
टिकून रहातात
भिगडत जातात तरी ओढत रहावी लागतात

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.