Loading ...

श्रावणमासी हर्ष मानसी - मराठी कविता (बालकवी)

श्रावणमासी हर्ष मानसी - मराठी कविता (बालकवी) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी यांची लोकप्रिय मराठी कविता श्रावणमासी हर्ष मानसी.

श्रावणमासी हर्ष मानसी - मराठी कविता (बालकवी)

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे...

श्रावणमासी हर्ष मानसी

बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे / ठोमरे)

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे वरति बघता इंद धनुचा गोफ दुहेरि विणलासे मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे झालासा सुर्यास्त वाटतो, सांज अहाहा तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळिच ते उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते फडफड करुनि भिजले अपुले पखं पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शु्द्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

बालकवी यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

  1. प्रत्युत्तरे
    1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

      हटवा
    2. आमच्या संदर्भांनुसार सदर ओळ अचूक आहे. आपल्याकडे काही अधिकृत संदर्भ असल्यास कृपया आम्हाला editor@marathimati.com यावर पाठवावेत.
      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

      हटवा
    3. बलाकमाळा " असा शब्द हवा

      हटवा
    4. कवितेत उचित बदल केल्याबद्दल धन्यवाद.

      हटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. बालकविंच्या सर्वच कविता अत्यंत सुंदर आहेत.
      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

      हटवा
  3. hi Kvita Farch Sundar Ahe.
    Mal Maze Balpan Athavle. Mala Shalet hi Kvita hoti.

    उत्तर द्याहटवा
  4. फार सुंदर कार्य करीत आहात. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची