पावसाच्या धारा - मराठी कविता

पावसाच्या धारा, मराठी कविता - [Pavsachya Dhara, Marathi Kavita] शिवाराचा असे राजा त्याची गाणी आज गाऊ, हिंडे रानातून साऱ्या माझा पाऊस भाऊ.
पावसाच्या धारा - मराठी कविता | Pavsachya Dhara - Marathi Kavita

शिवाराचा असे राजा त्याची गाणी आज गाऊ, हिंडे रानातून साऱ्या माझा पाऊस भाऊ

शिवाराचा असे राजा त्याची गाणी आज गाऊ
हिंडे रानातून साऱ्या माझा पाऊस भाऊ
लाघे चाहूल मृगाची आल्या पावसाच्या धारा
कोसळली झाडे फार फिरे मोकाट वारा
लख्खं विजेच्या आरशातून क्षणभर सारे पाहू

गेली ढेकळे फुटून वाहे पाणी रानातून
तरारले कोंब दूर-दूर शेतामध्ये ओळीओळीतून
कष्ट करून सालभर आता आनंदाने

नदी नाल्याच्या कडेला गुरे रेंगाळली आता
सैरावैरा झाली कशी वर झाकाळून जाता
करा आता आवरासावर शेतातून घरी जाऊ

लाडका तो भाऊराया मला येईल भेटाया
सारे शिवार पालटे गेली बदलून रया
दुष्ट उन्हाच्या झळ्या आता विसरत जाऊ

भाऊ माझा गोजीरवाणा मला बोलावत येई
होते झोपेतून जागी माझी धरणी आई
नाते आमुचे अतूट नित्यनेमाने भेट घेऊ
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.