Loading ...

चंदन वंदन किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

चंदन वंदन किल्ला - सातारा जिल्ह्यातील डोंगररांगेतील हा किल्ला इ.स. ११९१ - ११९२ सालच्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजे दुसरे भोज यांनी बांधला आहे.

चंदन वंदन किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

साताऱ्याच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर चंदन वंदन ही किल्ल्यांची दुर्गजोडी उभी आहे...

चंदन वंदन किल्ला

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

चंदन वंदन किल्ला (किल्ले) - (Chandan Vandan Fort) कथा आणि कांदबरी मध्ये जुळ्या भावा विषयी नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भांवडे आढळतात. त्यांच्यापैकीच एक चंदन - वंदन साताऱ्याच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे.

३८०० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. कथा आणि कांदबरी मध्ये जुळ्या भावा विषयी नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भांवडे आढळतात. त्यांच्यापैकीच एक चंदन - वंदन साताऱ्याच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. ऊसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर त्यामुळे रस्ते, वीज, एस.टी. या सर्व प्रार्थमिक सुविधा गावा-गावा पर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांचा पूर्वेस जरंडेश्वर कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड. एकीकडे महाबळेस्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.

चंदन वंदन किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)
चंदन वंदन किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

चंदन वंदन किल्ल्याचा इतिहास


इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमराहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.

चंदन वंदन किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


चंदनच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठिण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रस्ता बराच रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरुज आपणास प्रवेशद्वाराची जाणीव करून देतात. येथून साधारण १५ पायऱ्या पार गेले असता डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते. तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास ‘पाचवड” म्हणतात. बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात येथे यात्रा असते. (येथून दहा एक पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मोठ्या मोठ्या शिळा रचलेल्या दिसतात.) वंदनप्रमाणेच येथेही एक दर्गा आहे.

दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे बांधकाम आढळते. एका अर्धवट दरवाजासारखे काहीतरी दिसते. साधारण सदरेसारखे येथील बांधकामाचे अवशेष दिसतात. याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्ध्वस्त अवशेष आपणास दिसतात. हीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो. याच वाटेवर एक समाधी आढळते. याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस मारुतीची मूर्ती आहे. गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठ्या असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावकऱ्यांच्या मते हे कोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.

चंदन वंदन किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)
चंदन वंदन किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

चंदन वंदन गडावर जाण्याच्या वाटा


चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यावर जाणाऱ्या सयुंक्त वाटा आहेत. पुणे-सातारा मार्गावर भुईज गाव आहे. तेथे उतरून २० कि.मी. अंतरावर किकली गाव आहे. वाई-सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहे. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची. येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन. या चंदन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

दर्ग्यात रहायचे असल्यास ३०-४० जणांना राहता येते. जेवणाची सोय नाही. फक्त पावसाळ्यात पाण्याची सोय होते अन्यथा गडावर पाणी नाही. गडावर जाण्यासाठी अडीच ते ३ तास लागतात.

दुर्ग यासंबंधी महत्त्वाचे दुवे:

अभिप्राय

  1. चंदन वंदन किल्याच्या पायथ्याशी दुधनवाडी हे गाव आहे .पण कोणत्याच लेखात या गावाचा उलेखा नाही. असा का

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची