स्वप्नांचे गाणे - मराठी कविता

स्वप्नांचे गाणे, मराठी कविता - [Swapnanche Gaane, Marathi Kavita] माझ्याच स्वप्नांचा, बांधिला हिंदोळा, स्वप्नात रमण्याचा, लागला छंद खुळा.

माझ्याच स्वप्नांचा, बांधिला हिंदोळा, स्वप्नात रमण्याचा, लागला छंद खुळा

माझ्याच स्वप्नांचा
बांधिला हिंदोळा
स्वप्नात रमण्याचा
लागला छंद खुळा
स्वप्नांच्या गावी जावे
मनी वाटते जैसे
तैसेच स्वप्न पहावे
जागेपणीची दुःखे
स्वप्नी न येती कधी
आनंदी आनंद स्वप्नी
नसते कसलीच व्याधी
वाटेत स्वप्न रंगवावे
स्वप्नातच स्वप्न जगावे
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
स्वप्नांचे गाणे गावे


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.