मराठी म्हणी

मराठी म्हणी - [Marathi Mhani] मराठी भाषेतील आगळ्या-वेगळ्या आणि सर्वोत्तम मराठी म्हणींचा संग्रह.

मराठी भाषेतील आगळ्या-वेगळ्या आणि सर्वोत्तम मराठी म्हणींचा संग्रह

१) अंग मेहनतीचं काम, तेणे मिळे आराम.


२) आंधळी पाण्याला गेली, घागर फोडून घरी आली.


३) आंधळ्याने पांगळा पाहीला, पांगळ्याने मार्ग दाविला.


४) अभ्यास करेल त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी.


५) अरे चे उत्तर कारे, अहो चे उत्तर काहो.


६) अपकिर्ती झाली जनी, तो अर्धा मेला मनी.


७) अगंगं म्हशी, मला कुठं नेशी.


८) अडला नारायण, धरी गाढवाचे पाय.


९) अति तेथे माती.


१०) अति राग, भीक माग.


[next] ११) असतील शिते, तर जमतील भुते.


१२) असंगाशी संग, प्राणाशी गाठ.


१३) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.


१४) असून अडचण, नसून खोळंबा.


१५) असेल तेव्हा सोहळे, नसेल तेव्हा ओसरीत लोळे.


१६) आधी पोटोबा, मग विठोबा.


१७) आईचा हात, गोड लागे शिळा भात.


१८) आगीतून निघाला, फुफाट्यात पडला.


१९) आजा मेला, नातु झाला.


२०) आधी गुंतु नये आणि गुंतल्यावर कुंथु नये.


[next] २१) आळशाला आजाराचे निमंत्रण.


२२) आधी देव, मग जेव.


२३) आपण हसतो लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला.


२४) आपला तो बाळ्या, दुसर्‍याचे ते कारटे.


२५) आपला हात जगन्नाथ.


२६) आपलेच ओठ अन्‌ आपलेच दात.


२७) आपले ठेवायचे झाकून, दुसर्‍याचे बघायचे वाकून


२८) आपले ते गोजीरवाणे, दुसर्‍याचे ते लाजीरवाणे.


२९) आयत्या बिळात नागोबा.


३०) आमंत्रण दिले सगळ्या गावा, वादळ सुटले घरी जेवा.


[next] ३१) आयत्या पिठावर रेघोट्या.


३२) आल्यावर विपत्ती, कवे मैत्री आहे किती.


३३) आवड असली की सवड मिळते.


३४) आवडीने केला नवरा, त्याच्या पायात भवरा.


३५) आई जेवू घालीना, बाप भीक मागु देईना.


३६) आला चेव अन्‌ केला देव.


३७) इकडे आड तिकडे विहीर.


३८) ईश्वराची करणी, नारळात पाणी.


३९) उंदराचा जीव जातो अन्‌ मांजराचा खेळ होतो.


४०) उचलली जीभ की लावली टाळ्याला.


[next] ४१) उघड्यापाशी नागडे गेले, सारी रात हिवाने मेले.


४२) उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.


४३) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.


४४) उथळ पाण्याला, खळखळाट फार.


४५) उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी.


४६) उस गोड झाला, म्हणून मुळा सकट खाऊ नये.


४७) एक गाव, बारा भानगडी.


४८) एकटा जीव सदाशिव.


४९) एक घाव दोन तुकडे, काम करावे रोकडे.


५०) एक ना धड, भारा भर चिंध्या.


[next] ५१) एकपट विद्या, दसपट गर्व.


५२) एका हाताने टाळी, कधी न वाजे कोण्याकाळी.


५३) एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी.


५४) एकाने करायचे, सार्‍यांनी भरायचे.


५५) एवढीशी थट्टा, भल्या भल्यांना लावी बट्टा.


५६) ऐकावे जनाचे, करावे मनाचे.


५७) ऐकुन घेत नाही, त्याला सांगु नये काही.


५८) कठीण समय येता, कोण कामास येतो.


५९) कर नाही त्याला डर कशाला.


६०) करावे तसे भरावे.


[next] ६१) करून करून भागला, अन्‌ देव पुजेला लागला.


६२) कला कौशल्य ज्याचे हाती, त्याची होई जगी ख्याती.


६३) कशात काय आणि फाटक्यात पाय.


६४) कामापुरता मामा, ताकापुरती आजी.


६५) काखेत कळसा, गावाला वळसा.


६६) कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत.


६७) काळ आला होता पण वेळ आली नव्हती.


६८) कुठेही गेलं तरी पळसाला पाने तिनच.


६९) कुत्र्याचे जीणे, फजितीला काय उणे.


७०) कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ.


[next] ७१) केर डोळ्यात नि फुंकर कानात.


७२) कोकणात नारळ फुकट.


७३) कोणाच्या संगतीने काशी नि कोणाच्या संगतीने फाशी.


७४) कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा.


७५) कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी.


७६) कोंबडे झाकले म्हणून, तांबडे फुटायचे रहात नाही.


७७) खर्‍याचे खोटे, लबाडाचे तोंड मोठे.


७८) खटपट करी, तोच पोट भरी.


७९) खर्‍याचा दास नि खोट्याचा वस्ताद.


८०) खान तशी माती, गहू तशी रोटी.


[next] ८१) खाणे थोडे, मचमच फार.


८२) खाऊन पिऊन सुखी, हरीनाम मुखी.


८३) खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.


८४) खायला फार नि भुईला भार.


८५) खाली मुंडी, पाताळ धुंडी.


८६) गरज सरो, वैद्य मरो.


८७) गरीबांचा वाली परमेश्वर.


८८) गर्जेल तो पडेल काय, बोलेल तो करेल काय.


८९) गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.


९०) गाव करी ते राव न करी.


[next] ९१) गाढवास गुळाची चव काय?


९२) गाड्या बरोबर नळ्याची जत्रा.


९३) गोगलगाय अन्‌ पोटात पाय.


९४) घटकेची फुरसत नाही, दमडीची मिळकत नाही.


९५) घरा सारखा गुण, सासु तशी सुन.


९६) घर जळाल्यावर बोंब अन्‌ नाटक संपल्यावर सोंग.


९७) घर धन्याचे हाल अन्‌ फुकट्याचे वर गाल.


९८) घरात नाही दाणा, म्हणे मला बाजीराव म्हणा.


९९) घरात नाही लोटा, अन्‌ दिमाख मोठा.


१००) घरोब्याला घर खा, पण हिशोबाला चोख रहा.


[next] १०१) घर पहावे बांधुन अन्‌ लग्न पहावे करून.


१०२) घोडी मेली ओझ्याने व शिंगरु मेले हेलपाट्याने.


१०३) चढणीस घोडा, उतरणीस रेडा.


१०४) चव ना ढव, दडपून ठेव.


१०५) चावल्याशिवाय गिळत नाही, अनुभवल्याशिवाय कळत नाही.


१०६) चोरात चोर अन्‌ वर शिरजोर.


१०७) चोराच्या उलट्या बोंबा.


१०८) चोराच्या मनात चांदणं.


१०९) चोराला सोडून संन्याशाला फाशी.


११०) चोरीचा मामला हळूहळू बोंबला.


[next] १११) छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.


११२) जगन्नाथाचा भात, सर्वजण पसरे हात.


११३) जसे दान, तसे पुण्य.


११४) जात कळते पण मत कळत नाही.


११५) जातीची खावी लाथ पण परजातीचा खाऊ नये भात.


११६) ज्याचे जळे, त्याला कळे.


११७) ज्याची करावी कीव, तोच घेतो जीव.


११८) ज्याला नाही अक्कल, त्याची घरोघर नक्कल.


११९) जित्याची खोड मेल्या वाचुन जात नाही.


१२०) जीव जावो पण जिलेबी खावो.


[next] १२१) जुने ते सोने.


१२२) जुन्याला लाथा अन्‌ नव्याच्या चरणी माथा.


१२३) जो बायकोशी भला, तो खाई दही काला.


१२४) जो बोलण्यात बोलका, तो कृतीत हलका.


१२५) झाकली मुठ सव्वा लाखाची, उघडली म्हणजे फुकाची.


१२६) झोपेला धोंडा अन्‌ भुकेला कोंडा.


१२७) ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला.


१२८) ढेकणाच्या संगे, हिराही भंगे.


१२९) तप केल्यास बळ, वृक्ष लावल्यास फळ.


१३०) तहान लागल्यावर विहीर खोदणे.


[next] १३१) तळहाताने सुर्य झाकत नाही.


१३२) ताकापुरती आज.


१३३) ताकापुरते रामायण.


१३४) ताकाला जाऊन गाडगे लपविणे.


१३५) तुझे माझे पटेना, तुझ्या वावुन करमेना.


१३६) तुझे राहुदे तिकडे, माझे घे इकडे.


१३७) तुला ना मला, घाल कुत्र्याला.


१३८) तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले.


१३९) तोंड चोपडा, मनात वाकडा.


१४०) तोंड दाबून, बुक्यांचा मार.


[next] १४१) तोंडावर गोड, मनात वाकडा.


१४२) तोंडावर हांजी हांजी आणि मागे दगलबाजी.


१४३) दात कोरल्याने पोट भरत नाही.


१४४) दाम करी काम, बिवी करी सलाम.


१४५) दिवसभर चरते, मंगळवार धरते.


१४६) दिव्याखाली अंधार.


१४७) दिवाळी दसरा, हात पाय पसरा.


१४८) दिसते तसे नसते, म्हणून जग फसते.


१४९) दिसतो मोठा, अकलेचा तोटा.


१५०) दिसायला भोळा, मुदलावर डोळा.


[next] १५१) दुष्काळात तेरावा महिना.


१५२) दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना.


१५३) दुर्गुण आणि विपत्ती, आळसापासून उत्पत्ती.


१५४) दुधाची तहान ताकाने भागविणे.


१५५) दुधात कालविते मीठ, हा स्वभाव नाही नीट.


१५६) दुरून डोंगर साजरे.


१५७) दुरून बगळा दिसतो साधा, आत कपटाची बाधा.


१५८) देखल्या देवा दंडवत.


१५९) देव नाही देव्हारी, धुपाटणे उड्या मारी.


१६०) देह देवळात, चित्त खेटरात.


[next] १६१) दे रे हरी, पलंगावरी.


१६२) देव तारी त्याला कोण मारी.


१६३) देश तसा वेश.


१६४) दैव देते कर्म नेते.


१६५) दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ.


१६६) धरले तर चावते, सोडले तर पळते.


१६७) न खात्या देवाला, नैवेद्य फार.


१६८) नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.


१६९) नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये.


१७०) नखभर सुख, हातभर दुःख.


[next] १७१) नदीचे मुळ आणि ऋषीचे कुळ कधी पाहू नये.


१७२) नमस्कार फुकाचा, आशिर्वाद लाखाचा.


१७३) नशीब लागले द्यायला, पदर नाही घ्यायला.


१७४) न कर्त्याचा वार शनिवार.


१७५) नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे.


१७६) न बोलता दुःख फार, बोलण्याने हलका भार.


१७७) नाक दाबले की तोंड उघडते.


१७८) नाकापेक्षा मोती जड, सासुपेक्षा सून अवजड.


१७९) नाकाच्या शेंड्याला जीभ पुरविणे.


१८०) नाकापर्यंत पदर अन्‌ वेशीपर्यंत नजर.


[next] १८१) नाचता येईना, अंगण वाकडे.


१८२) नाव मोठे लक्षण खोटे.


१८३) नाव सगुणी पण करणी अवगुणी.


१८४) निंदकाचे घर, असावे शेजारी.


१८५) पाण्याची धाव समुद्राकडे, बायकांची धाव सोन्याकडे.


१८६) पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही.


१८७) पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.


१८८) पी हळद आणि हो गोरी.


१८९) पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.


१९०) प्रकृती तितक्या विकृती.


[next] १९१) फाटके नेसावे पण स्वतंत्र असावे.


१९२) फुकटचे खाय, त्याला स्वस्त महाग काय?


१९३) बळी तो कान पिळी.


१९४) बढाईला पुढे अन्‌ लढाईला मागे.


१९५) बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर.


१९६) बायकोचा भाऊ, लोण्याहून मऊ.


१९७) बुडत्याचे पाय डोहाकडे.


१९८) बुडत्याला काडीचा आधार.


१९९) बोलण्यात जोर अन्‌ कामात अंगचोर.


२००) भटाला दिली ओसरी, भट हात पाय पसरी.


[next] २०१) भित्यापाठी ब्रह्मराक्षस.


२०२) भुकेले कोल्हे, काकडीला राजी.


२०३) मरावे परी कीर्ती रूपे उरावे.


२०४) मन नाही स्थिरी, बहु तीर्थ करी.


२०५) मान सांगावा जना, अपमान सांगावा मना.


२०६) मामाच्या घरी भाचा कारभारी.


२०७) माय तसं लेकरू, गाय तसं वासरू.


२०८) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.


२०९) मुर्ख भांडती, वकील घरे बांधती.


२१०) मेंढी जाते जीवानिशी, खाणारा मागतो वातड होती.


[next] २११) मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.


२१२) यथा राजा तथा प्रजा.


२१३) रात्र थोडी, सोंग फार.


२१४) राजा बोले, दाढी हाले.


२१५) लबाड्याचे निमंत्रण, जेवल्यावर खरे.


२१६) लहान तोंडी, मोठा घास.


२१७) लाथ मारीन तिथे पाणी काढीन.


२१८) लाज ना अब्रु, कशाला घाबरू.


२१९) लेकीला तूप साखर, सुनेला मीठ साखर.


२२०) लेकी बोले, सुने लागे.


[next] २२१) लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण.


२२२) लंगडी गाय, वासरात शहाणी.


२२३) वड्याचे तेल वांग्यावर काढणे.


२२४) वराती मागून घोडे.


२२५) विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर.


२२६) वेड घेऊन पेडगावास जाणे.


२२७) वेष असावा बावळा, परी अंगी असाव्या नाना कळा.


२२८) वेळ ना वखत्‌ अन्‌ गाढव चालले भुकत.


२२९) वेळीच जो जागे तो भीक ना मागे.


२३०) व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि देश तितक्या संस्कृती.


[next] २३१) शहाण्याला एक बात, मुर्खाला सारी रात.


२३२) शितावरून भाताची परिक्षा.


२३३) सगळा गाव मामाचा, एक नाही कामाचा.


२३४) सर्व आहे घरी, पण नियत नाही बरी.


२३५) सोळा हात लुगडी आणि अर्धी तंगडी उघडी.


२३६) स्नान करून पुण्य घडे, तर पाण्यात बेडूक काय थोडे.


२३७) हसतील त्याचे दात दिसतील.


२३८) हपापाचा माल गपापा.


२३९) हाताचे सोडून पडत्याच्या पाठी मागे लागू नये.

मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

ब्लॉगर


  सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,9,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,843,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,615,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,20,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,4,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,261,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,32,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,59,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,2,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,204,पालकत्व,1,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक बळी,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,4,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,4,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,71,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,87,मराठी कविता,476,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,16,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,24,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,10,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,387,मसाले,12,महाराष्ट्र,270,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,3,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,43,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,13,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,8,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,20,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,1,संदेश ढगे,37,संपादकीय,18,संपादकीय व्यंगचित्रे,12,संस्कार,1,संस्कृती,125,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,16,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,87,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,204,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: मराठी म्हणी
मराठी म्हणी
मराठी म्हणी - [Marathi Mhani] मराठी भाषेतील आगळ्या-वेगळ्या आणि सर्वोत्तम मराठी म्हणींचा संग्रह.
https://1.bp.blogspot.com/-ip6ycyFtXEc/XfWuVogzlFI/AAAAAAAAFRQ/iYzqtXfPNbgiTmUpqp8L8yovlBjtR6oaACLcBGAsYHQ/s1600/marathi-mhani.png
https://1.bp.blogspot.com/-ip6ycyFtXEc/XfWuVogzlFI/AAAAAAAAFRQ/iYzqtXfPNbgiTmUpqp8L8yovlBjtR6oaACLcBGAsYHQ/s72-c/marathi-mhani.png
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2002/09/marathi-mhani.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2002/09/marathi-mhani.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची