Loading ...

कशी साजरी करू मी दिवाळी घरात (मराठी कविता)

कशी साजरी करू मी दिवाळी घरात (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची कशी साजरी करू मी दिवाळी घरात ही कविता.

कशी साजरी करू मी दिवाळी घरात (मराठी कविता)

सांगा यंदा साजरी होईल का दिवाळी माझ्या घरात


कशी साजरी करू मी दिवाळी घरात (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी गोकुळ कुंभार यांची कविता ‘कशी साजरी करू मी दिवाळी घरात’.



यंदा सोयाबिन होत चांगलं जोमात
खुळ्यागत पाऊस पडतोय तेही गेलं कोमात
सांगा अशाने होईल का दिवाळी माझ्या घरात

अनुदानाच्या आशेनं बघतोय सरकारकडं
त्यांचंच नाही काही खरं बघू तरी मी कोणाकडं

पोरगी येईल घरी दिवाळीच्या सणाला
बाजारासाठी खिश्याकडे हात जातोय
काय करणार तोही आहे फाटलेला
सांगा यंदा होईल का दिवाळी माझ्या घरात.

पोरगं फटाक्यांसाठी रडत होतं
त्याला कालपासून प्रदुषणाचं परिणाम संगितलं
तेव्हां कुठं शांत बसलं
पैशासाठी लेकरांची मन दुखवून
साजरी होईल का दिवाळी माझ्या घरात

कर्जाचं टेन्शन येतयं डोक्याला
हिरव झाडं दिसल कि वाटतं करावं का सोबती या झाडाला
यंदा दिवाळीत लक्ष्मी येईल का माझ्या घराला

दसऱ्याला जाळलेल्या रावणासारखं मन धगधगतंय

सांगताना सुद्धा पाणी येतयं डोळ्यात
दिवाळी सण आनंदाचा, प्रकाशांचा पण
शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र यंदा दुःख आणि काळ्या ढगांचा अंधार
सांगा यंदा साजरी होईल का दिवाळी माझ्या घरात

- गोकुळ कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची