
ट्राय करुन तर बघा; वाढत्या महागाईचा त्रास अजिबात होणार नाही.
कारण! देशातला “प्रामाणिक कॉमन मॅन” ह्या व्यतिरीक्त दुसरे काय करू शकतो?
बाकी देशाचा आर्थिक विकास, बलाढ्य परराष्ट्रीय धोरणं, मंगळग्रहावर मानवी वस्ती, ग्लोबल वॉर्मिंग, सेव्ह वॉटर - सेव्ह अर्थ, मानवता हा एकच धर्म, उच्च शिक्षण व्यवस्था.
ह्या सगळ्या भाकडकथा आहेत हो!
...खरं तर कॉमन मॅन ने “जय श्रीराम” करत १० बाय १० च्या खोलीतच अडकून पाडायचं
...आणि नेत्यांनी आणि त्यांच्या मुलांनी परदेशात उच्च शिक्षण घेऊन “कोटी - कोटीची” उड्डाणं घ्यायची.
हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे.
- अमित पापळ