पुण्यातील नवीन फॅड - व्यंगचित्र

पुण्यातील नवीन फॅड, व्यंगचित्र - [Punyatil Navin Fad, Cartoon] कारण पुणे आमच्या श्वासात आणि नसानसात आहे.
पुण्यातील नवीन फॅड - व्यंगचित्र | Punyatil Navin Fad - Cartoon

कारण पुणे आमच्या श्वासात आणि नसानसात आहे

मी एक #पुणेकर आहे आणि i ♥️ आख्खे पुणेच की..!!

कारण पुणे आमच्या श्वासात आणि नसानसात आहे.

पण सध्या पुण्यातील बऱ्याचशा सुजान #लोकप्रतिनिधींनी एक नवीन fad आणले आहे.

“I ♥️XXवेवाडी”, “i ♥️XXज”, “I ♥️डेक्क...” वगैरे वगैरे..!!

बरं हे करतात ते करतात... पण हे एक एक बोर्ड बनवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च आहे.

तो खर्च कुठुन होतो? महानगरपालिकेच्या तिजोरीमधून...

म्हणजेच आपल्या जनतेच्या पैश्यामधूनच ना...???

#आम्ही पुणेकर हे बिरुद साऱ्या जगात प्रसिद्ध आहे, अगदी पुर्वी पासून...

मग हे असे पुण्यातल्या प्रत्येक भागांचे लाखो रुपयांचे बोर्ड जनतेचे पैसे खर्च करुन खरंच लावायची काही गरज आहे का??

आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जबाबदारीची प्रार्थमिक कामं जरी निट लक्ष देऊन केली नां, तरी खुप आहे; आणि हे असले “i ♥️” चे बोर्ड त्यांनी रस्त्यांवर लावण्या ऐवजी आपापल्या हृदयात लावावे.

खरच पुणे आपोआप खुप #सुंदर होईल; आणि हो... नशीब अजून “i ♥️ दाXआळी”, “i ♥️बुXXXपेठ” हे असले बोर्ड अजून कुठे #झळकले नाही हो...

😷😷😷😖😖😖

-अमित पापळ

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.