ईश्वराला हार आणि, तुम्हाला पेढे, एवढंच मी म्हणेन
ईश्वराला हार आणितुम्हाला पेढे
एवढंच मी म्हणेन
बहीण पास झाली
हे तुम्हीच समजायचे
शेवटचे वर्षही तिने पार केले
बहिणीला हॉंगकॉंगला जायचे आहे
पण तिने कल्याण स्टेशन
नीट पाहिले नाही अद्याप
तिला पायलटचा कोर्स
करायचा आहे
पण ती सायकल चालवायला घाबरते
बिनरहदारीच्या रस्त्यावर
तिला आयुष्यात खूप खूप खूप काही
करायचे आहे
पण ती तर नुकतीच बी.ए झाली आहे
तिच्या उज्वल भवितव्यामध्ये
मी खंबीर
हातात
ईश्वराला हार आणि
तुम्हांला पेढे घेऊन