Loading ...
/* Dont copy */

कण्हेरगड किल्ला

कण्हेरगड किल्ला - [Kanhergad Fort] ३५८२ फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील अजंठा सातमाळ डोंगररांगेतील कण्हेरगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

कण्हेरगड किल्ला - Kanhergad Fort

कण्हेरगडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रवळ्या जवळ्या, धोडप कंचना, हंड्या अशी संपूर्ण सातमाळ दिसते.

कण्हेरगड किल्ला - [Kanhergad Fort] ३५८२ फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील अजंठा सातमाळ डोंगररांगेतील कण्हेरगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. अंजठा सातमाळ रांग म्हणजे नाशिक आणि गुजरातच्या सीमेवरील तटबंदीच होय. याच रांगेत आडवाटेवर एक किल्ला आहे. त्याचे नावं कण्हेरगड. इतिहास प्रसिद्ध असा हा कण्हेरगड आजमितिस बराच दुर्लक्षित आहे.

कण्हेरगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गडावर पोहचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो. येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं दिसते. नेढ्याच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथा बराच प्रशसत आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो. गडमाथ्यावर पाण्याची ६ ते ७ टाकी आहेत. महादेवाची पिंड आहे. धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कड्यात खोदलेली आहे. गडावर वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडाचे दुसरे तोक हे धोडपच्या माची सारखेच आहे. गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रवळ्या जवळ्या, धोडप कंचना, हंड्या अशी संपूर्ण सातमाळ दिसते.

कण्हेरगड गडावर जाण्याच्या वाटा


नाशिक-नांदुरी मार्गे: नाशिकवरून नांदुरी गाव गाठावे. नांदुरीतून कळवणला जाणाऱ्या रस्त्यावरच नांदुरी गाव आहे. नांदुरी पासून ६ कि.मी. अंतरावर आठंबा गाव आहे. या गावातून २ कि.मी. अंतरावर असणाऱ्या ‘सादडविहिर’ या गावात यावे. सादडविहीर गावातून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट आहे. या गावातून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो.

नाशिक कळवण मार्गे: नाशिक कळवण मार्गे ओतूर गाठावे. ओतूर मधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारे कण्हेरवाडी गावात यावे. कण्हेरवाडी गावातून वर सांगितलेली खिंड गाठण्यास १ तास लागतो. या दोन्ही वाटा वर सांगितलेल्या खिंडीत येऊन मिळतात. गडावरून येणारी एक सोंड सुद्धा याच खिंडीत उतरते. ती सोंड पकडून एक तासाच्या खड्या चढणी नंतर आपण गडमाथ्यावर पोहचतो. वाट निसरडी आहे. त्यामुळे जरा जपूनच चढावे लागते.

किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात ५ लोकांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण करावी लागते. किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सादडविहिर गावातून दीड तास कण्हेरीवाडीतून २ तास. किल्ल्यावर सर्व ऋतुंमध्ये जाऊ शकतो.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची