आले आवळा पाचक वड्या

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

आले आवळा पाचक वड्या

आले-आवळा पाचक वड्या - [Ginger Awala Pachak Vadya] थंडीच्या दिवसात आणि खोकला आल्यास तसेच प्रवासात उपयोगी अश्या ह्या ‘आले आवळा पाचक वड्या’ चवीला सुंदर लागतात.

जिन्नस


  • २४० ग्रॅम डोंगरी आवळे
  • एक टेबलस्पून आल्याची पेस्ट
  • एक टेबलस्पून ओवा
  • मीठ
  • चिमूटभर साखर
  • एक चमचा जिरे पावडर

पाककृती


आवळे स्वच्छ धुवून कोरडे करा. किसून घ्या.

त्यात उरलेले सर्व जिन्नस टाका आणि हाताने कालवा.

तळहातावर लहान वड्या थापा. ते ताटात ठेवून तीन-चार दिवस उन्हात ठेवा.

सुकल्यावर त्या हवाबंद डब्यात ठेवा.