मराठी सुविचार

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Marathi Good Thoughts

सुविचार - मराठी सुविचारांचा संग्रह [Suvichar, Marathi Good Thoughts, Marathi Suvichar].

विचारधन - जगभरातील नामवंत विचारवंतांचे विचारधन.

मनाचे श्लोक - समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक.

सुविचार[Suvichar, Marathi Good Thoughts, Marathi Suvichar] ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं. आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण... पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.सुविचार

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.सुविचार

प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.सुविचार

जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.सुविचार

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.सुविचार

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.सुविचार

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.सुविचार

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.सुविचार

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !सुविचार

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !सुविचार

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.सुविचार

छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.सुविचार

आपण जे पेरतो तेच उगवतं.सुविचार

फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.सुविचार

उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.सुविचार

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.सुविचार

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.सुविचार

आधी विचार करा, मग कृती करा.सुविचार

आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.सुविचार

फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !सुविचार

comments powered by Disqus