दैनिक राशिभविष्य - ७ ऑक्टोंबर २०१५

प्रकाशक संपादक मंडळ | ७ ऑक्टोंबर २०१५

दैनिक राशिभविष्य | Daily Horoscope in Marathi

दैनिक राशिभविष्य - [Daily Horoscope in Marathi] १२ राशींचे आज दिनांक ७ ऑक्टोंबर २०१५ चे भविष्य.

मेष - अष्टमात राहू असल्याने प्रत्येक गोष्ट योग्य तऱ्हेने करा. मस्ती व शक्तीचे प्रदर्शन टाळा. हुरळून न जाता संयम ठेवा.

वृषभ - कामाचा उत्साह वाढेल. कामात प्रभाव जाणवेल. कला, साहित्य क्षेत्राला वाव मिळेल. मुलांकडून सुवार्ता समजतील. काही शुभ घटनांचा अनुभव येईल.

कर्क - अडचणींनी मानसिक दडपण येण्याची शक्यता असते. मंगळ, राहू व षष्ठातील रवि यांच्या मदतीने बाजू सावरली जाईल व प्रतिष्ठाही शाबूत राहील. परंतु यासाठी संयम, प्रयत्नशीलता व हुशारी हवी.

तुळ - अडचणीं व समस्यांची मालिकाच पुढे उभी राहते. बऱ्याचदा मानसिक अस्थिरता जाणवेल. खर्च वाढेल. घरगुती वाद उद्भवतील. विरोधकांचा ससेमिरा सतावेल.

सिंह - हुशारी यांच्या समन्वयाने मार्ग काढू शकाल. बोलण्यात साखर पेरून कार्यभाग साधा. विरोधकांच्या कारवायांवर नजर ठेवा. कायद्याची चौकट ओलांडू नका.

मिथुन - कौटुंबिक प्रश्न, संशयाचे वातावरण, आथिर्क चणचण अशा गोष्टींचे पडसाद जाणवतात. पण रवि, शुक्र, गुरु, मंगळ यांच्या अनुकूलतेने अडचणी सोडवाल.

कन्या - आकर्षक प्रगती. कला, साहित्य, राजकीय क्षेत्र, बौद्धिक यांना उत्तम चालना मिळून चांगली प्रगती साधेल. प्रवास कराल. आथिर्क बाजू सावरता येईल

वृश्चिक - शुक्र प्रतिकूलता असल्याने सहज कामे होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. पाहुण्यांची वर्दळ, वाढता खर्च. कौटुंबिक प्रश्न, प्रकृतीच्या कुरबुरी अशा अनेक गोष्टींतून मार्ग काढा

धनू - नव्या ओळखी, नवे क्षेत्र याचा लाभ घेता येईल. मंगल कार्याचे योग. क्रीडाक्षेत्रात चांगले यश मिळेल. नोकरीत सुलभता. वरिष्ठांची मजीर्.

मकर - यशाची वाढ सहजसोपी होईल पण त्याचबरोबर रविशुक्र, राहूबुध यांची साथ लाभल्याने कार्यभाग साधाल. नोकरी - व्यवसायात सुलभता. कला - साहित्याला वाव. प्रवास कराल.

कुंभ - शनि, रवि यांच्या अशुभ भ्रमणात शुक्राची भर पडल्याने नव्या समस्या व घरगुती प्रश्नांचा त्रास. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा.

मीन - नव्या कल्पनांची स्थित्यंतरे दिसू लागतील. त्यातून मिळणारे यश बौद्धिक, व्यावसायिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर राहण्यास मदत करेल.