MarathiMati.com
Tarun

तरूण

Tarun - Youth of Maharashtra

तरूण | Tarun

साठी उलटल्या नंतर आठवते गीता, पुराण, रामायण, देवदर्शन, आरत्या, धर्म, संस्कृती ज्याचा खरा-खुरा उपयोग हा पंचवीशी सुरु होण्यापुर्वी असतो, तेव्हा कीती काळ आपण या साठीतल्या देव-देव करणाऱ्या मुखवट्यांच्या जगात वावरणार, ज्ञानार्जणाचा काळ साठी नसून पंचविशीतल्या आत-बाहेर असतो आता हे समजून घेण्याची वेळ येवुन ठेपली आहे.
शिक्षण, मैत्री, प्रेम, जिव्हाळा याला संस्कृतीची सुंदर झालर लावुयात, चला नव्या युगाचे नवे भारतीय तरूण बनुयात.

महान व्यक्तींचे विचार

आमचे स्वप्न

आपली अर्थव्यवस्था आणि सामाजिक चौकट ही दोन्ही कालबाह्य, जुनी पुराणी झाली आहेत.
- जवाहरलाल नेहरु

थोरांचे बोल

सावधानता

अहंता, संशय, वासना द्वेष व खोट्या श्रद्धा ह्या पंचकापासून दूर रहा.
- गौतमबुध्द

संतांचे विचार धन

औदार्य आणि प्रेम

"सागरासारखी उदारता आणी धरतीमातेसारखी माया शोधू गेल्यास सापडणार नाही. धरणीमाता आपल्या बालकावर किती प्रेम करते ! उभे रहायला जागा, प्यायला पाणी, खायला अन्न कंदमुळे, फ़ळे, कपड्यासाठी कापूस, खोदून मागितले की तांबे, सोने, धातू, हिरे, माणके, घरे-बांधायला लाकूड, दगड, लोखंड, जे जे आवश्यक ते सर्व बाळाकरिता तयार ! अर्थात प्रयत्न, परिश्रम व पुरुषार्थ हा हवाच !
सागर किती उदार ! स्वत: तापून वाफ़-ढग बनवतो आणि आकाश गंगा धार धार कोसळते !
धरती, सागर, सूर्य, चंद्र, वारा, आकाश पुरुषोत्तमाची प्रकॄति-मातेच्या वत्सलतेने आपल्या बाळाकरता किती कष्ट उपसते ! हे मात्र आपण डोळे उघडून कधीच पाहात नाही .."
- संतवाणी

जीवनाचे स्वरुप

जीवनाचे दर्शन - एका शब्दात

संपूर्ण जीवनाचे दर्शन मी एका शब्दात पाहिले आहे. जीवनामध्ये मी कोणतेही काम एकट्याने कधीही केले नाही. माझा जन्म, पालनपोषण आणि शिक्षण दुसऱ्यांच्या आधारामुळे पुर्ण झाले आहे. मी कोणतीही मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करतो. तेव्हा त्यामध्ये मुलीनाच करत होत्या. मी मात्र त्यांना फ़क्त संगीत देत होतो, नाचत नव्हतो. त्यामुळे मला माझे संपूर्ण जीवनाचे दर्शन, एका शब्दामध्ये साठले आहे असए वाटते. त्या एका शब्दाच्या आधारे, सहाय्याने मी आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहे. तो शब्द आहे - मदत.

कोणालाही आपण मदत करुन बघा. आपल्याला आपल्यामध्ये एका नवीन प्रकारचा बदल झालेला अनुभवास येईल.
- रिचर्ड शेजर्स

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony