गुढीपाडव्याचे महत्त्व

गुढीपाडव्याचे महत्त्व - [Gudhi Padwa Mahatva] साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण ‘गुढी पाडवा’, कसा साजरा करावा?
गुढीपाडव्याचे महत्त्व - सण-उत्सव | Gudhi Padwa Mahatva - Festival
गुढीपाडव्याचे महत्त्व - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण (सण-उत्सव), छायाचित्र: हर्षद खंदारे.
गुढीपाडव्याचे महत्त्व - (Gudi Padwa Mahatva) साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण ‘गुढी पाडवा’, कसा साजरा करावा, त्याचे धार्मिक, आध्यात्मीक, वैज्ञानीक महत्व आणि या दिवशी पंचांगाचे काय महत्व असते या बद्दल माहिती देणारा लेख.

अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने‘नीम: ए ट्री फॉर सॉल्विंग ग्लोबल प्रॉब्लेम्स’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कडूनिंबाचे फार महत्त्व आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कडूनिंब भक्षणाचे महत्त्व आहे.

ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो.

गुढी पाडव्याविषयी प्रचलीत असलेल्या विविध आख्यायीका

शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निजीर्व झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी.

दुसर्‍या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वषीर् शालिवाहन शक १९३० चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते ‘शक’ असा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ यामध्ये करण्यात येतो.

वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.

भगवान श्री विष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.

गुढीपाडवा असा साजरा करावा!

  • गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी.
  • अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे.
  • नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी.
  • देवांची पूजा करावी.
  • घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे.
  • वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी.
  • अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी.
  • या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे.
  • पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा.
  • या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.

गुढीपाडव्याला कडूनिंब भक्षणाचे महत्त्व

अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने ‘नीम: ए ट्री फॉर सॉल्विंग ग्लोबल प्रॉब्लेम्स’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कडूनिंबाचे फार महत्त्व आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कडूनिंब भक्षणाचे महत्त्व आहे.

निम्बस्तिक्त : कटू : पाकेलघु : शीतोह्यग्नि-वात-कृत। ग्राही हृद्यो जयेत् पित्त-कफ-मेह-ज्वर-कृतीन्।। कुष्ठ-कासारूपी हल्लास-श्ववथु-व्रणात्।

- स्त्रोत्र संग्रह

भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, डोक्यात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाहरोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर (ताप) मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडूनिंब उपयुक्त आहे. मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा उपयोग करावा. अति कडूनिंब सेवन आरोग्यास अपायकारक असते. जंतुनाशक म्हणूनही कडूनिंब उपयुक्त आहे.

पंचांगाचे महत्व

गुढीपाडव्यापासून, नवीन शालिवाहन शकवर्षारंभापासून नवीन पंचांगाची सुरुवात होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कातिर्क, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन हे चांद-महिने एकामागोमाग येत असतात. भारतीय कालमापनात ऋतू व सण यांनी सांगड घातलेली आहे. त्यासाठी सौर व चांदपद्धतीचा मेळ घातलेला आहे. महिन्यांची नावे व आकाश यांचाही संबंध आहे. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्याप्रारंभी पूवेर्ला उगवून पहाटे पश्चिमेस मावळते. वैशाख महिन्यात विशाखा! ज्येष्ठात ज्येष्ठा! तसेच त्या महिन्यांच्या पौणिर्मेला चंद त्या त्या नक्षत्रापाशी असतो. म्हणजे चैत्र पौणिर्मेला चंद चित्रापाशी! जानेवारी-फेब्रुवारीचे तसे नसते.

कलियुगाची एकंदर ४ लक्ष ३२ हजार वर्षे आहेत. त्यापैकी पाच हजार ११४ वर्षे झाली. येत्या गुरुवारी (११ एप्रिल २०१३) गुढीपाडव्याला ५११५ वर्षांचा प्रारंभ होईल. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगानी पंचांग बनते. इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून तिथी प्रचारात आहेत. इ.स. पूर्व एकहजार वर्षांपासून वार प्रचारात आहेत. नक्षत्रेही इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आहेत. ‘योग’ हे पंचांगातील चौथे अंग इ.स. ७०० नंतरच प्रचारात आले. पाचवे अंग ‘करण’ हे इ.स.पूर्व १५०० पासून प्रचारात आले. पंचांग म्हणजे आकाशाचे वेळापत्रक! वर्षभरातील खगोलीय घटनांचे वेळापत्रक पंचांगात असते. पंचांगे ही सूर्यसिद्धांत, ग्रहलाघव, करणकल्पकता या करणग्रंथांवरून तयार केली जात.

सध्या पंचांगे ही संगणकावर तयार केली जातात. ती जास्त सूक्ष्म असतात.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.