आज दिनांक २४ एप्रिल २०१८ चे मराठी पंचांग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ एप्रिल २०१८

आजचे मराठी पंचांग | Today's Marathi Panchang

आजचे मराठी पंचांग - [Today's Marathi Panchang] भारतीय मराठी पंचांग नुसार तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, सुर्योदय, सुर्यास्त, शुभ-अशुभ, चंद्रराशी आणि दिनविशेष माहिती देणारे समग्र पंचांग.

तारीखवारतिथी
२४ एप्रिल २०१८सोमवारचैत्र कृ. त्रयोदशी २४।०४
नक्षत्रयोगकरण
उ. भाद्रपदाऐंद्र, वैधृतिगरज
सुर्योदय - सुर्यास्तचंद्रराशीशुभ-अशुभ
०६.१६१८.५७मीनप्रतिकूल दिवस
दिनविशेष : श्री अक्कलकोट स्वामी पुण्यतिथी, सोमप्रदोष, शिवरात्री

पंचांग म्हणजे काय?


पंचांग हा संस्कृत शब्द आहे. पंचानाम् अंगानां समाहारः । = ज्यात पाच अंगांचा समावेश असतो.

मराठी पंचांग, हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योगकरण. या पाच अंगांची माहिती यात असते म्हणून या कोष्टकाला पंचांग म्हणतात. हा मुळचा संस्कृत शब्द आहे. (पंचानाम् अंगानां समाहारः । = ज्यात पाच अंगांचा समावेश असतो ते) पंचांगात वर दिलेल्या पाच बाबींशिवाय आणखीही बरीच माहिती असते. पंचांगात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात.

पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय व ज्योतिषींना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह-मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण , उत्सव , जयंती, पुण्यतिथी, यात्रा, रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहिती, धार्मिक कृत्यांविषयीचे निर्णय आदी गोष्टी पंचांगांत सापडतात. पंचांगात हिंदूंव्यतिरिक्त अन्य भारतीयांच्या दैनंदिन कालगणनेची थोडक्यात दिलेली माहितीदेखील असते.