Loading ...
/* Dont copy */

६ मेचा इतिहास

६ मेचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ६ मेचा इतिहास.

६ मेचा इतिहास | May 6 in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ६ मेचा इतिहास पहा.


६ मेचा इतिहास, छत्रपती शाहू महाराज | Chhatrapati Shahu Maharaj
६ मेचा इतिहास, छत्रपती शाहू महाराज (छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह)

छत्रपती शाहू महाराज - (२६ जून १८७४ - ६ मे १९२२).


शेवटचा बदल ५ मे २०२४

जागतिक दिवस / दिनविशेष

६ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

६ मेचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

६ मेचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १५४२: संत फ्रांसिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचले.
  • १६३२: मुघल सम्राट शाहजहान व आदिलशहा यांच्यामधे शहाजी महाराजांना पराभूत करण्याबद्दल तह झाला.
  • १७३९: चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी वसई मोहीम जिंकून उत्तर कोकण मराठा साम्राज्यात आणले.
  • १८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावांच्या पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाल्या.
  • १८४०: पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
  • १८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.
  • १९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.
  • १९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
  • १९८३: ॲडॉल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
  • १९८४: कृत्रिम श्वसन न करता एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे फू दोरजी हे पहिले भारतीय ठरले.
  • १९९४: इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅंकॉइस मित्रॉं यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
  • १९९७: बॅंक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यात आली.
  • १९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
  • २००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
  • २००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून जामिनावर सुटका.

जन्म (वाढदिवस, जयंती)

६ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

६ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १५८९: तानसेन (शहंशाह अकबर यांच्या दरबारातील एक नवरत्‍न रामतनू पांडे ऊर्फ तन्नामित्र, त्रिलोचन, तनसुखटा खान तथा संगीतसम्राट).
  • १८६२: हेन्‍री थोरो (अमेरिकन लेखक व विचारवंत).
  • १९२२: छत्रपती शाहू महाराज (सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक).
  • १९४६: भुलाभाई देसाई (स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते).
  • १९५२: मारिया मॉंटेसरी (इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ).
  • १९६६: रॅंगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ).
  • १९९५: आचार्य गोविंदराव गोसावी (प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक).
  • १९९९: कृष्णाजी शंकर हिंगवे (पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य).

६ मेचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



मे महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे मे महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / मे महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची