Loading ...
/* Dont copy */

७ मेचा इतिहास

७ मेचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ७ मेचा इतिहास.

७ मेचा इतिहास | May 7 in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ७ मेचा इतिहास पहा.


७ मेचा इतिहास, रविंद्रनाथ टागोर | Rabindranath Tagore
७ मेचा इतिहास, रविंद्रनाथ टागोर (छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह)

रवींद्रनाथ टागोर - (७ मे १८६१ - ७ ऑगस्ट १९४१) रवींद्रनाथ ठाकूर ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते.


शेवटचा बदल ७ मे २०२४

जागतिक दिवस / दिनविशेष

७ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • रेडियो दिन: रशिया.
  • एड्समुळे अनाथ झालेल्यांचा जागतिक दिवस.

७ मेचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

७ मेचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १८४९: स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी ‘कलकत्ता फिमेल स्कूल’ सुरू केले. या शाळेचे आता ‘बेथुन कॉलेज’ मध्ये रूपांतर झाले आहे.
  • १८७८: पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन (आताचे साहित्य संमेलन) भरविण्यात आले.
  • १८९५: अलेक्झांडर पोपॉफने प्राथमिक रेडिओ रिसीव्हर वापरून रेडिओ संदेशवहनाचा प्रयोग यशस्वी केला.
  • १९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
  • १९४६: सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.
  • १९५२: जेफ्री डमर याने आधुनिक संगणनाचा आधार असलेल्या 'इंटिग्रेटेड सर्किट्स'ची संकल्पना प्रकाशित केली.
  • १९५४ - १९५५: सर्व विषयांसाठी मराठी माध्यम आणण्याचा ठराव पुणे विद्यापीठाच्या विधिसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
  • १९५५: एअर इंडियाची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.
  • १९७३: अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरचा पायाभरणी समारंभ.
  • १९७६: होंडा एकॉर्डा ही गाडी प्रकाशित करण्यात आली.
  • १९७८: एव्हरेस्टची पहिली ऑक्सिजनरहित मोहीम यशस्वी.
  • १९८० : जागतिक आरोग्य संघटनेने देवी रोगाचे उच्चाटन झाल्याचे जाहीर केले.
  • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
  • १९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
  • १९९४: नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
  • २०००: व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • २०००: कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.

जन्म (वाढदिवस, जयंती)

७ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८६१: रविंद्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक.
  • १८८०: डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक; भारतरत्‍न.
  • १९०९: एडविन लॅंड, अमेरिकन संशोधक.
  • १९०९: एडविन एच. भूमी, पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक.
  • १९१२: पन्नालाल पटेल, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार.
  • १९२३: आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक.
  • १९३२: राज मोहन वोहरा, शौर्य आणि नेतृत्त्वाबद्दल महावीर चक्र आणि परम विशिष्ठ सेवा पद सन्मानित लेफ्टनंट जनरल.
  • १९४८: नित्यानंद हळदीपूर, मैहर घराण्याचे बासरी वादक.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

७ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १९२४: अल्लुरी सीताराम राजू, आदिवासींना जंगलात जाण्याचा हक्क मिळण्यासाठी लढणारा क्रांतिकारक.
  • १९८६: शिवाजीराव पटवर्धन, समाजसुधारक.
  • १९९१: मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू, लोककवी.
  • १९९४: उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर, ध्रुपद गायक.
  • २००१: मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर, लेखिका.
  • २००१: प्रेम धवन, गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
  • २००२: दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
  • २०२०: मालविका मराठे, (१९९१ - २००१ या काळातल्या त्या दूरदर्शन या दूरचित्रवाणी प्रसारक संस्था-सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका.)

७ मेचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



मे महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे मे महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / मे महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची