Loading ...
/* Dont copy */

जय जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती

जय जय दीनदयाळा, सत्यनारायणाची आरती - जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा, पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा (Jai Jai Dindayala, Satyanarayanachi Aarti).

जय जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती | Jai Jai Dindayala - Satyanarayanachi Aarti

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा...

जय जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती

आरत्या

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥ पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ ध्रु० ॥ विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥ परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥ घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥ प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय० ॥ १ ॥ शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥ दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥ त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥ भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ जय० ॥ २ ॥ साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥ इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥ त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥ स्मृति हो‍उनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥ जय० ॥ ३ ॥ प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥ क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥ अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥ मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥ जय० ॥४ ॥ पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥ पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥ अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥ ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥ जय० ॥ ५ ॥ अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥ इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥ संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥ राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥ जय० ॥ ६ ॥ ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा । भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा । भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥ मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ जय जय० ॥ ७ ॥

विष्णूच्या इतर आरत्या वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची