Loading ...
/* Dont copy */

जय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती

जय देवी मंगळागौरी, मंगळागौरीची आरती - जय देवी मंगळागौरी, ओवाळीन सोनियाताटी, रत्नांचे दिवे [Jai Devi Mangalagauri, Mangalagaurichi Aarti].

जय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती

जय देवी मंगळागौरी, ओवाळीन सोनियाताटी, रत्नांचे दिवे...

जय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती

मंगळागौरीच्या आरत्या

जय देवी मंगळागौरी ॥ ओवाळीन सोनियाताटी ॥ रत्नांचे दिवे ॥ माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥ ध्रु० ॥ मंगळमूर्ती उपजली कार्या ॥ प्रसन्न झाली अल्पायुषी ॥ राया तिष्ठली राजबाळी ॥ अहेवपण द्यावया ॥ जय ० ॥ १ ॥ पूजेला ग आणिती जाईच्या कळ्या ॥ सोळा तिकटी सोळा दूर्वा ॥ सोळा परीची पत्री ॥ जाई जुई आबुल्या शेवंतू नागचांफे ॥ ध्रु० ॥ पारिजातकें मनोहरे ॥ गोकर्ण महाफुले ॥ नंदेटें तगरें ॥ पूजेला ग आणिली ॥ जय० ॥ २ ॥ साळीचे तांदूळ मुगाची डाळ ॥ अळणी खिचडी रांधिती नार ॥ आपुल्या पतीलागी सेवा करिती फार ॥ जय० ॥ ३ ॥ डुमडुमे डुमडुमे वाजंत्रे वाजती ॥ कळावी कांकणे हाती शोभाती ॥ शोभती बाजुबंद ॥ कानी कापांचे गबे ॥ ल्यायिली अंबा शोभे ॥ जय० ॥ ४ ॥ न्हाउनी माखुनी मौनी बैसली ॥ पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ॥ स्वच्छ बहुत हो‍उनी ॥ अंबा पूजूं बैसली ॥ जय० ॥ ५ ॥ सोनियाचे ताटी ॥ घातिल्या आता ॥ नैवेद्य षड्रसपक्वान्ने ॥ ताटी भरा मोदे जय० ॥ ६ ॥ लवलाहे तिघे काशी निघाली ॥ माऊली मंगळागौरी भिजवू विसरली ॥ मागुती परतुनिया आली ॥ अंबा स्वयंभू देखिली ॥ देऊळ सोनियांचे ॥ खांब हिरेयांचे ॥ वरती कळस मोतियांचा ॥ जय० ॥ ७ ॥

मंगळागौरीचीच्या इतर आरत्या वाचा:

जय देवी मंगळागौर - मंगळागौरीची आरती - मंगळागौर गीत (व्हिडिओ)


अभिप्राय

  1. غير معرف21 أغسطس, 2022

    बऱ्याच ठिकाणी शुद्धलेखनाच्या चुका व चुकीचे शब्द दिलेले आहेत. परंतू ह्या सगळ्या आरत्या सहजपणे उपलब्ध करून दिल्याबदद्ल विशेष आभार . ॥ ४ ॥ मधे कानी हा शब्द कानीं असा लिहिला गेला आहे . ॥ ६ ॥ मधे शेवटची ओळ ताटी भरा बोने च्या ऐवजी तारी भरा मोदे असे पहिजे . मोद ह्याचा अर्थ आनंद . मोदे ह्याचा अर्थ आनंदाने

    ردحذف
    الردود
    1. आपण सुचविलेल्या टंकलेखनच्या चुका दुरूस्त केल्या आहेत.
      धन्यवाद!

      حذف
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची