Loading ...
/* Dont copy */

१० मेचा इतिहास

१० मेचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक १० मेचा इतिहास.

१० मे दिनविशेष | 10 May in History

दिनांक १० मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


जगदीश खेबुडकर (Jagdish Khebudkar)
जगदीश खेबुडकर (Jagdish Khebudkar)

जगदीश खेबुडकर - (१० मे १९३२ - ३ मे २०११)


शेवटचा बदल ४ मे २०२४

जागतिक दिवस

१० मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • संविधान दिन: मायक्रोनेशिया.
  • पालक दिन: दक्षिण कोरिया.
  • मातृ दिन: मेक्सिको.
  • जलसंधारण दिन: महाराष्ट्र.

ठळक घटना (घडामोडी)

१० मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • इ.पू. २८: सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले.
  • १५०३: क्रिस्टोफर कोलंबसने केमन द्वीपसमूहाला भेट दिली व त्यांचे नामकरण ला तोर्तुगा असे केले.
  • १७७३: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अ‍ॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती.
  • १७९६: नेपोलियन बोनापार्टने इटलीत ऑस्ट्रियाच्या सैन्याचा पराभव केला.
  • १८१८: इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
  • १८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.
  • १८५७: पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुरू.ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली.
  • १९०९: सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हटले.
  • १९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
  • १९८१: मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला.
  • १९९३: तीन महिला सदस्य असलेल्या एका तुकडीने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले. त्यातील २३ वर्षाच्या संतोष यादवने हे शिखर दुसर्‍यांदा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला. एका वर्षाच्या आत हे शिखर सर करणारी ती जगातील पहिली महिला बनली.
  • १९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
  • १९९६: एव्हरेस्टवर हिमवादळ. चढाई करणारे ८ व्यक्ति ठार.
  • १९९७: ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
  • २००२: घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरु असताना चेंगराचेंगरी. १२० ठार.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१० मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८३८: जॉन विल्क्स बूथ (अब्राहम लिंकनचा मारेकरी, मृत्यू: - ).
  • १८५५: युकतेश्वर गिरी (भारतीय गुरु आणि शिक्षक, मृत्यू: - ).
  • १८६३: उपेंद्रकिशोर राय (संगीतकार, लेखक आणि चित्रकार, मृत्यू: - ).
  • १८८९: नारायण दामोदर सावरकर (विनायक सावरकरांचे बंधू, कादंबरीकार, मृत्यू: - ).
  • १९०५: पंकज मलिक (गायक व संगीतकार, मृत्यू: - ).
  • १९०९: बेल्लारी शामण्णा केशवन (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक, मृत्यू: - ).
  • १९१४: ताराचंद बडजात्या (चित्रपट निर्माते, मृत्यू: - ).
  • १९१८: रामेश्वरनाथ काओ (रिसर्च ॲंड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मृत्यू: - ).
  • १९२७: नयनतारा सहगल (भारतीय लेखिका, मृत्यू: - ).
  • १९३१: जगदीश खेबूडकर (ज्येष्ठ गीतकार, मृत्यू: - ).
  • १९४०: माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस (प्रसिद्धी पराङ्मुख गीतकार व कवी, मृत्यू: - ).
  • १९६०: बोनो (आयरिश गायक, मृत्यू: - ).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१० मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १४८२: पाओलो डाल पोझो टोस्कानेली (इटलीचे गणितज्ञ व अंतराळतज्ञ, जन्म: - ).
  • १८९९: महादेव विनायक रानडे (रॅंड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या करणारे, जन्म: - ).
  • १९८१: विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन (विनोदी लेखक प्राध्यापक, जन्म: - ).
  • १९९८: यदुनाथ दत्तात्रय थत्ते (पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक, जन्म: - ).
  • २०००: नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे (कवी, जन्म: - ).
  • २००१: सुधाकरराव नाईक (महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री,हिमाचल प्रदेशचे राज्यपाल, जन्म: - ).
  • २००२: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी (गीतकार, जन्म: - ).
  • २०१५: निनाद बेडेकर (भारतीय इतिहासकार, लेखक, जन्म: - ).

१० मेचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



मे महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे मे महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / मे महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची