Loading ...
/* Dont copy */

२० जूनचा इतिहास

२० जूनचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २० जूनचा इतिहास.

२० जूनचा इतिहास | June 20 in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक २० जूनचा इतिहास पहा.


२० जूनचा इतिहास
२० जूनचा इतिहास, लक्ष्मणराव किर्लोस्कर. छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.

लक्ष्मणराव किर्लोस्कर - (२० जून १८६९ - २६ सप्टेंबर १९५६) भारतीय उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते. सन १८८८ साली त्यांनी बेळगाव येथे एक सायकल दुरुस्तीच्या दुकानाने आपल्या व्यावसायाची सुरुवात केली होती. पुढे त्यांच्या किर्लोस्कर समूहाने शेतीसाठी बनविलेले आपले लोखंडी नांगर हे पहिले उत्पादन.


शेवटचा बदल २० जून २०२४

जागतिक दिवस / दिनविशेष

२० जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • ध्वज दिन: आर्जेन्टिना.


२० जूनचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

२० जूनचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक


  • १६३१: आयर्लंडमधील बाल्टिमोर शहर अल्जीरियाच्या चाच्यांनी लुटले.

अठरावे शतक


  • १७५६: कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले.

  • १७८२: अमेरिकेच्या कॉंग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.

  • १७८९: पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी टेनिस कोर्टवरील शपथ घेतली व फ्रेंच क्रांतीला बळ दिले.

  • १७९१: फ्रेंच क्रांतीत आपले मरण असल्याचे ओळखून फ्रेंच राजघराण्याने व्हारेनला पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला.

एकोणीसावे शतक


  • १८३७: व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी.

  • १८४०: म्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.

  • १८६२: रोमेनियाचा पंतप्रधान बार्बु कटार्जुची हत्या.

  • १८६३: वेस्ट व्हर्जिनीया अमेरिकेचे ३५वे राज्य झाले.

  • १८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला.

  • १८८७: देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.

  • १८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

विसावे शतक


  • १९१९: मायाग्वेझ, पोर्तोरिको येथील तियात्रो याग्वेझ या नाट्यगृहाला आग. १५० ठार.

  • १९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९५६: व्हेनेझुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.

  • १९६०: मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

  • १९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.

  • १९६०: सेनेगालला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

  • १९९०: ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.

  • १९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.

एकविसावे शतक


  • २००१: परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.


जन्म (वाढदिवस, जयंती)

२० जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८६९: लक्ष्मणराव किर्लोस्कर
    (किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक, मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६).

  • १९१५: टेरेन्स यंग
    (चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार, मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४).

  • १९३९: रमाकांत देसाई
    (जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष, मृत्यू: २८ एप्रिल १९९८).

  • १९४६: जनाना गुस्माव
    (पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष).

  • १९४८: लुडविग स्कॉटी
    (नौरूचे राष्ट्राध्यक्ष).

  • १९५२: विक्रम सेठ
    (भारतीय लेखक आणि कवी).


मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२० जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १६६८: हेन्‍रिच रॉथ
    (जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक, जन्म: १८ डिसेंबर १६२०).

  • १८३७: विल्यम चौथा
    (इंग्लंडचा राजा, जन्म: २१ ऑगस्ट १७६५).

  • १९१७: जेम्स मेसन क्राफ्ट्स
    (अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, जन्म: ८ मार्च १८३९).

  • १९८७: डॉ. सलीम अली
    (पक्षिशास्त्रज्ञ व पद्मभूषण पुरस्कर्ते, जन्म: १२ नोव्हेंबर १८९६).

  • १९९७: भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल
    (मराठीतले शायर, जन्म: २९ डिसेंबर १९०८).

  • २००८: चंद्रकांत गोखले
    (मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता, जन्म: ७ जानेवारी १९२१).

  • २०१३: डिकी रुतनागुर
    (भारतीय पत्रकार, जन्म: २६ फेब्रुवारी १९३१).

२० जूनचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



जून महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / जून महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची