Loading ...
/* Dont copy */

४ सप्टेंबरचा इतिहास

४ सप्टेंबर दिनविशेष - [4 September in History] दिनांक ४ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

दादाभाई नौरोजी

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ४ सप्टेंबर चे दिनविशेष


दादाभाई नौरोजी - (४ सप्टेंबर १८२५ - ३० जून १९१७) भारतीय राजकारणी असलेले दादाभाई नौरोजी हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले होते.


शेवटचा बदल १ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
४ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
४ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
  • १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
  • १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.
  • १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.
  • १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
  • १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
  • २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
  • २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.

जन्म / वाढदिवस / जयंती
४ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८२५: दादाभाई नौरोजी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह, मृत्यू: ३० जून १९१७).
  • १९०१: विल्यम लियन्स जॅग्वोर (जॅग्वोर कार चे सहसंस्थापक , मृत्यू: ८ फेब्रुवारी १९८५).
  • १९०५: वॉल्टर झाप (मिनॉक्स चे शोधक, मृत्यू: १७ जुलै २००३).
  • १९१३: पी. एन. हक्सर (प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८).
  • १९२३: राम किशोर शुक्ला (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: ११ डिसेंबर २००३).
  • १९३७: शंकर सारडा (साहित्यिक व समीक्षक, मृत्यू: २८ जानेवारी २०२१).
  • १९४१: सुशीलकुमार शिंदे (केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री).
  • १९५२: ऋषी कपूर (भारतीय चित्रपट अभिनेते, मृत्यु: ३० एप्रिल २०२०).
  • १९६२: किरण मोरे (भारतीय यष्टीरक्षक).
  • १९६४: आदेश श्रीवास्तव (भारतीय गायक-गीतकार, मृत्यू: ५ सप्टेंबर २०१५).
  • १९७१: लान्स क्लूसनर (दक्षिण अफ्रिकेचे अष्टपैलू क्रिकेटपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
४ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १९९७: डॉ. धर्मवीर भारती (हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, जन्म: २५ डिसेंबर १९२६).
  • २०००: मोहम्मद उमर मुक्री (खळाळून हसवणारे विनोदी कलाकार, जन्म: ५ जानेवारी १९२२).
  • २०१२: सय्यद मुस्तफा सिराज (भारतीय लेखक, जन्म: १३ ऑक्टोबर १९३०).
  • २०१२: हांक सूफी (भारतीय गायक-गीतकार, जन्म: ३ मार्च १९५२).
  • २०१५: विल्फ्रेड डी डिसोझा (भारतीय सर्जन आणि राजकारणी, जन्म: २३ एप्रिल १९२७).

४ सप्टेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



सप्टेंबर महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे सप्टेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / सप्टेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची