सप्तपदीच्या वेळी, पुढं असणारं पाऊल, संसार सुरू होताच, अडखळलं
सप्तपदीच्या वेळीपुढं असणारं पाऊल
संसार सुरू होताच
अडखळलं
तू माझ्या पुढं झालास
मागं बघितलंही नाहीस
जरा धीट झाले
तुझ्या पावला बरोबर
पाऊल पडू लागलं
तेव्हाची तुझी नजर...?
मी नाही लक्ष दिलं
तशीच चालत राहिले
पायांना गती आली
तुझी ती नजर दिसेना
माझा वेग वाढला
तुझ्यापुढं...
तू मात्र मागं फिरलास
माझ्या बरोबर चालायचं
तुला मान्य नसावं...
सप्तपदीची आठवण झाली
तेव्हा हात हातात होता
आता तो सुटला होता
मग ठरवलं
आता असंच चालायचं
मोकळं मोकळं...
क्षितिजाला कवेत घेण्यासाठी!
मागं वळूनही पहायचं नाही