Loading ...
/* Dont copy */ body{user-select:none;-moz-user-select:none;-ms-user-select:none;-khtml-user-select:none;-webkit-user-select:none;-webkit-touch-callout:none} pre, code, kbd, .cmC i[rel=pre]{user-select:text;-moz-user-select:text;-ms-user-select:text;-khtml-user-select:text;-webkit-user-select:text;-webkit-touch-callout:text}

मुलगी वयात येत आहे (आरोग्य)

मुलगी वयात येत आहे (आरोग्य) - मुलगी वयात येत असताना तिच्यात होणार्‍या शारीरिक आणि मानसिक बदलाची कशी काळजी घ्यावी याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.

मुलगी वयात येत आहे (आरोग्य)
मुलगी वयात येत आहे (आरोग्य), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
मुलगी वयात येत आहे (आरोग्य) - मुलांच्या पेक्षा मुली वयात लवकर येत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. या काळात मुलीच्यात खूप बदल घडून येत असतो.

कळी उमलतानाचे बदल काय असतील?

मुलांच्या पेक्षा मुली वयात लवकर येत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. या काळात मुलीच्यात खूप बदल घडून येत असतो. पाळी येणे हा त्यांच्या शरीरात होणारा महत्त्वाचा बदल होय.

पन्नास वर्षांपूर्वी पाळी सुरू होण्याचं वय साधारणतः १५ ते १६ वर्षांच्या दरम्यानं असायचं. आता १२ वर्षांची मुलगी असताना पाळी येते असं पाहणीत आढळून आलं आहे.

पाळीचं वय आधी का यावं याचं कारण समजणं तसं अवघडच आहे. पण सर्वसाधारण असं म्हणता येईल, की मेंदूच्या वाढीमुळे हा फरक होणं शक्य आहे. सभोवतालचं वातावरण आणि सात्त्विक पोषक आहारामुळे मुलींची एकुण वाढ लवकर होते आणि त्यामुळे मेंदूचीही वाढ लौकर होते. त्यामुळे शरीरातही बदल लौकर होणे साहजिकच असतं. जर १५ ते १६ वर्षांपर्यंत पाळी सुरू झाली नाही, तर मुलीच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असतो.


पहिली पाळी येण्यापूर्वी

पहिली पाळी येण्यापूर्वीचा जो काळ असतो त्या दिवसात मुलींच्यात शारीरिक आणि मानसिक बदल घडून येत असतात त्याविषयी माहिती करून घेणं उद्बोधक ठरेल.


मनोव्यापारातील बदल

मुलीचं मुलासारखं बंधमुक्त वागणं कमी होत जातं आणि तिचं एका मुग्ध कलिकेत रूपांतर होऊ लागतं. अल्लडपणा जातो. तिचं वागणं, बोलणं काहीसं लाजाळू होतं. आपण आता लहान राहिलो नाही याची तिला पुसटशी जाणीव होऊ लागते. लहान मुलासारखं वागविलं गेलं, तर तिला राग येऊ लागतो. तिला आता अधिकाधिक स्वतंत्रपणे वागण्याची इच्छा होऊ लागते.

कुटुंबातील मोठ्या व्यक्तिंची प्रत्येक गोष्ट मुकाट्यानं ऐकण्याचं आणि सांगितलेलं पाळण्याचं तिला नको वाटतं. एवढंच नाही, तर आपल्या घरातल्यांशी उगीचच गप्पाटप्पा करण्याचही ती टाळायला पाहाते. एकांतात राहणंच ती पसंत करू लागते. चित्रं बघत बसणं किंवा वाचीत बसणं तिला आवडू लागतं.


शारिरीक बदल

पहिल्या पाळीच्या सुमाराला शरीरात होणारा मुख्य बदल म्हणजे छातीची वाढ होणं आणि गुप्तेंद्रियावर लव येणं, स्तन मोठे होणं हा नैसर्गिक बदल असतो. त्याचप्रमाणे लव येणं हाही बदल नैसर्गिकच असल्यानं त्याबद्दल कोणतीही लाज मुलीनं बाळगता कामा नये.

या काळात काही मुली खांदे उंचावून आणि कुबड काढून चालतात. वाढणारे स्तन लपविण्यासाठी त्या पोक काढतात. पण असं करण्यानं त्या त्यांच्या शरीराची ऐटच घालवून बसतात. काही मुली छातीचे फुगवटे लपविण्यासाठी घट्ट बॉडीज वापरतात. अर्थात त्यामुळे त्या ते लपवू शकत नाहीतच पण रक्ताभिसरण सुद्धा व्यवस्थित होत नाही.

मुलींच्या स्तनाची वाढ होणे यात त्यांना लाज संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. उलट त्यांना आपल्या स्त्रीत्वाचा अभिमानच वाटायला हवा. कायमच अज्ञानी, अबोध मुलगी म्हणून राहण्यापेक्षा प्रत्येक मुलीनं आपल्यात होणारे बदल आणि त्यांची कारणं जाणून घेण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे.


इतर आणखी बदल

पहिली पाळी येण्यापूवी काही आठवडे मुलीला पांढऱ्या रंगाचा स्त्राव जाऊ लागतो. तो पाहताच काहीजणी घाबरून जातात. आपल्याला काहीतरी रोग झाला आहे, अशी त्यांना भिती वाटू लागते, पण हा पांढरा स्त्राव होणं अनैसर्गिक नसून या काळात तो होणारच असतो.

पाळी यावयाच्या आधी काही आठवडे ओटीपोटात दुखू लागतं, तेव्हाही काही मुली घाबरून जातात. हे दुखणं गर्भाशयाच्या आकुंचन होण्याच्या क्रियेमुळे असतं आणि ते कालक्रमानं थांबतं.

काही मुलींच्या गळ्यातील थॉयरॉईड ग्रंथीची वाढ होते. त्यामुळे गळा फुगल्यासारखा होतो त्याला गोलाई येते. पण हे तात्कालिक असते. त्यात घाबरून जाण्यासारखे काहीही नसते हे लक्षात ठेवावे.

याच काळात होणारा आणि त्रासदायक वाटणारा एक प्रकार म्हणजे तारुण्यपिटिका. पाळीपूर्वी चेहऱ्यावर या पुटकुळ्या येऊ लागतात आणि साहजिकच मुलींना याचा मनास्ताप होऊ लागतो. आपल्या दिसण्याबद्दल विशेष दक्षता या काळात मुलींना असल्यानं या पिटिका त्यांच्या सौंदर्यात बाधच आणतात. पण या पिटिका म्हणजे शरीरात होणाऱ्या बदलाचाच एक भाग असतो एवढं त्यांनी लक्षात ठेवावं.

काही मुली या काळात लठ्ठ होऊ लागतात. अशा मुलींच्या आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. पण कटाक्षानं अगदी कमी खाणं किंवा उपास करणं अशी उपाययोजना या लठ्ठपणावर कोणी करू नये. या वयात मुलीला सकस पोषक आहाराची आवश्यकता असते. फक्त खूप आहाराच्याबाहेर खाणं टाळलं म्हणजे झालं.


वयात येणाऱ्या मुलीच्या आईची जबाबदारी

मुलगी वयात येत असल्यामुळं तिच्यात होणारे मानसिक बदल प्रामुख्यानं तिच्या आईनं समजून घेतले पाहिजेत आणि तिच्याशी समजून वागलं पाहिजे. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिच्यावर कोणत्याही परिस्थितीत रागवता कामा नये. तिच्या वागणुकीतील बदल आईनं स्वीकारायला हवेत.

आता आपली मुलगी विकसित होत आहे आणि ती स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठीच या बदलाला सामोरी जाते आहे हे लक्षात घेऊन आईनं मुलीला आता आदराची बरोबरीची वागणूक द्यायला हवी.

प्रत्येक मुलीला, पाळी म्हणजे काय? याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणे ही अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि पाळी येणे ही एक आनंदाचीच घटना आहे हे तिला समजावूनं दिलं पाहिजे.

काही आया आपल्या मुलीला पाळी आली ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. साहजिक मुलीलाही ही एक शरमेचीच गोष्ट वाटू लागते. पाळी येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. उलट पाळी न येणं हीच अनैसर्गिक गोष्ट आहे. ३ ते ५ दिवस रक्तस्त्राव होणं ही एक नैसर्गिक बाब असते आणि त्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्त्राव होऊ लागला तर मात्र ते अयोग्य असतं, हे मुलींना सांगितलं पाहिजे.

पाळीच्या दिवसात शरीराची स्वच्छता कशी ठेवावी हेही आईनं मुलीला शिकवायला हवं. काही मुलींच्या पोटात पाळी चालू असतांना खूपच दुखतं, काहींना फार दुखत नाही. हे दुःख तसं इतकं तीव्र नसतं. लाडावलेल्या मुली मात्र त्याचा बाऊ करतात.

पहिली एक-दोन वर्षे पाळी नियमितपणे दर महिन्याला येईलच असं नसतं. दोन किंवा तीन महिन्यांनीसुद्धा पाळी येऊ शकते. यात अनैसर्गिक असं काही नसतं. पण ही वस्तुस्थिती आईनं मुलीला सांगायला हवी. कारण पाळी दर महिना आली नाही तर मुलगी घाबरून जाते. तिच्या मनात भलते विचार येऊ लागतात.

पाळी येऊन गेल्यावरसुद्धा गर्भधारणा होऊ शकते. खरं म्हणजे पाळी कधीच आली नसतानाही गर्भधारणा होवू शकते. अर्थात अशी उदाहरणं फारच कमी असतात.

माझ्याकडे, अकरा वर्षांची एक मुलगी आली. तिचं पोट वाढलेलं होतं. पण आईच्या म्हणण्याप्रमाणं तिला एकदाही पाळी आली नव्हती. तपासल्यावर ती गर्भार असल्याचं आढळून आलं. ते ऐकून आईला आश्चर्यच वाटलं. एकदाही पाळी न आल्यामुळं, मुलीचं पोट वाढलं आहे त्याचे कारण कदाचित ट्यूमर असू शकेल असं तिला वाटत होतं. त्या मुलीला एक गुटगुटीत मुलगा झाला. अर्थात अशी उदाहरणं अगदी दुर्मिळ असतात.

मुलींच्यात होणारे शारिरीक आणि मानसिक बदल जाणून घेऊन, तिच्या येऊ घातलेल्या पहिल्या पाळीच्या संदर्भात तिचं मन तयार करणं, पाळी म्हणजे काय याची माहिती करून देणं हे प्रत्येक मुलींच्या आईचं कर्तव्य आहे.

पूर्वीच्या पिढीतील मुलीच्यावेळची सभोवतालची परिस्थिती वेगळी होती. एकच कुटुंबपद्धती होती. घरात खूप माणसं असायची. बायकांची एकमेकीत पाळी, लग्न, गर्भारपण, बाळंतपण या विषयांवरच्या गोष्टींची चर्चा चालू असायची, वयात येणाऱ्या मुली आपल्या बहिणींकडून ते सारं शिकत असतं. पण आता कुटुंबव्यवस्थाच बदलत गेली आहे. बहुसंख्य कुटुंब आता लहान असतात.

एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येत चालली आहे. आता मुलांना आपले आई - वडील एवढंच आपलं कुटुंब हे माहीत असते. आपल्या चुलत, मावस भावंडांबद्दल, काका, मामा, आत्या यांच्याबद्दल फारशी माहिती नसते अशा परिस्थितीत कुटुंबातील सगळ्या मुलांची जबाबदारी प्रामुख्यानं आईवरच येऊन पडते. साहजिकच शरीरातील बदल आणि पाळीबद्दलची भीती मुलींच्या मनातून काढून टाकण्यासाठी आईनंच संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणं आणि योग्य रीतीनं पार पाडणं आवश्यक असतं.

मुलींच्या त्या संक्रमणावस्थेच्या कालात आईनं तिच्याशी हळुवारपणे, मैत्रीच्या नात्यानं वागून, विश्वासात घेऊन मुलीचं मनोधैर्य वाढविण्यासाठी झटलं पाहिजे. आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि सर्वार्थानं परिपूर्ण अशी उद्याची स्त्री, म्हणून मुलीचं व्यक्तिमत्त्व विकसित करायला पुढं सरसावलं पाहिजे.

-डॉ. (सौ) पद्मा राव

अभिप्राय: 4
  1. सौ. एस. एस. दवे०६ जुलै, २०२२

    वयात येऊ घातलेल्या प्रत्येक तरुण मुलीच्या आईने वाचायला हवा असा लेख.
    मराठीमाती थॅन्क्स.

    उत्तर द्याहटवा
  2. नेमक्या शब्दांतला उपयोगी लेख.

    उत्तर द्याहटवा

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1066,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,1,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,827,आईच्या कविता,21,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,4,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,17,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,23,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,46,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,60,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,8,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,424,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,70,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,51,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,10,निवडक,2,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,88,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,8,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,707,मराठी गझल,19,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,14,मराठी टिव्ही,41,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,14,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,36,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,181,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,87,मातीतले कोहिनूर,16,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,21,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,55,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,131,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,20,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सीमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: मुलगी वयात येत आहे (आरोग्य)
मुलगी वयात येत आहे (आरोग्य)
मुलगी वयात येत आहे (आरोग्य) - मुलगी वयात येत असताना तिच्यात होणार्‍या शारीरिक आणि मानसिक बदलाची कशी काळजी घ्यावी याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj2q4VS2Fy_Tmyf1nEn1r3CbGc05LS84EWG5dBJVEpOHdoEdE5Uy0Ae7AxdHXcp-qIrhrJgU7ErY-Way130EcTscn7NbpsGaEvdvy8UuVpMGVKldSyc-eTGSlyixOYnmr5QAzZl17Zxm5O65uUr7KzKeR7BjRDkuZYjpJR7q9b6BWmMrEFolC9-_qIhXw/s1600/mulagi-vayat-yet-ahe.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj2q4VS2Fy_Tmyf1nEn1r3CbGc05LS84EWG5dBJVEpOHdoEdE5Uy0Ae7AxdHXcp-qIrhrJgU7ErY-Way130EcTscn7NbpsGaEvdvy8UuVpMGVKldSyc-eTGSlyixOYnmr5QAzZl17Zxm5O65uUr7KzKeR7BjRDkuZYjpJR7q9b6BWmMrEFolC9-_qIhXw/s72-c/mulagi-vayat-yet-ahe.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/07/mulagi-vayat-yet-ahe.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/07/mulagi-vayat-yet-ahe.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची