Loading ...
/* Dont copy */

शांत सागरी कशास - मराठी कविता (संजीवनी मराठे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री संजीवनी मराठे यांची शांत सागरी कशास ही लोकप्रिय मराठी कविता.

शांत सागरी कशास - मराठी कविता (संजीवनी मराठे)

शांत सागरी कशास उठविलीस वादळे


शांत सागरी कशास - मराठी कविता (संजीवनी मराठे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री संजीवनी मराठे यांची शांत सागरी कशास ही लोकप्रिय मराठी कविता.



शांत सागरी कशास उठविलीस वादळे?
काय हे तुझ्यामुळे
देहभान हरपले

युगसमान भासतात आज नाचरी पळे
निमिषमात्र लोचनात
दिव्य तेज दाविलेस

भडकुनी तयेच वन्हि जीव आतला जळे
अमृतमधुर बोल एक
श्रवणी जो न पाडिलास

अधिरता भरे जिवात केव्हढी तयामुळे
पढविल्या वदे वचांस
बद्ध त्या विहंगमास

गायिलेस तू कशास गीत नंदनातले?
स्वर्ग कल्पनेतला येईल कधी भूतला
दिवसरात्र अंतरात आस ही उचंबळे

- संजीवनी मराठे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची