Loading ...
/* Dont copy */

समस्त उच्चभ्रुवाल्यांनो - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मुकुंद शिंत्रे (मुकुंद मोरेश्वर शिंत्रे) यांची समस्त उच्चभ्रुवाल्यांनो ही लोकप्रिय मराठी कविता.

समस्त उच्चभ्रुवाल्यांनो - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

थूऽ तुमच्या भांच्योद नितंबू छिनालछाप जिनगानीचा, अधिकार नाही तुम्हाला चटोर चमचमीत खाण्याचा... समस्त उच्चभ्रुवाल्यांनो

समस्त उच्चभ्रुवाल्यांनो

मुकुंद शिंत्रे (कवितासंग्रह:एक बामण ढसाळलेला । नाशिक, महाराष्ट्र)

थूऽ तुमच्या भांच्योद नितंबू छिनालछाप जिनगानीचा अधिकार नाही तुम्हाला चटोर चमचमीत खाण्याचा तीन-तीन घड्यांच्या वळकुटी गळ्यात अन्न न्‌ मांस लोटण्याचा मक्ता घेतला का त्यांनी कोरभर कुटक्यासाठी वणवण दूर भटकण्याचा नाही अधिकार स्लिव्हलेसी पुष्टोन्मत दंड दाखवून ओठाचा चंबू करण्याचा डोंगराएवढे भुंडे लचकवून झुलवून-थुलवून चालण्याचा नाजूक-साजूक तुपात घोळून अखंड लेक्चर झोडण्याचा ‘दया वाटते’ एवढंच म्हणून गांडू नक्राश्रु ढाळण्याचा गाड्या - इमलयात फिरुन-झुरुन सुखांतिक बुके खरडण्याचा मिशीचा बालाचा पिळ-विग ठेऊन धारुन स्मार्ट म्हणून दिसण्याचा बुके सारी पढून-पढवून षंढ बुकोन्मत होण्याचा थुऽ तुमच्या षंढचोट हृदयात कावळा शिवला मीहाऽऽ किती दिवस जगणार असलं फालतू खोटं खिन्न जीणं लाखोंना असते उभ्या देशात दोन वेळच्या भाकरीची भ्रांत म्हणून अधिकार नाही तुम्हाला खळखळून खोकून हसण्याचा समाजवादाची न्यारी गती ठेवलीए त्यांनी केलीए त्यांनी सदान्‌कदा झिंगून-भंगून ठेचकाळणारी मुंबई दिल्लीला झुलणारे खिळणारे घोडे गाढवे लाळीव कुत्रे, मांजर, डुक्कर, सफेद बगळे व्हायचे नाही त्यांच्याने हे अवघड काम उचलू आपला खारीचा वाटा बापजादी भुतांना सारुन दूर मिसळा त्यांच्यात ओथंबुन झोकून चिलटाएवढे देऊन काम कोरभर कुटका खिलवून सांगून त्यांना घ्या जल्दी सामावून सत्तेचा भ्रष्ट गुखाडीत वळवळणारे हे राजकारणी किडे त्यांना ‘घाण’ हा शब्दच ठाऊक नाही भ्रष्टाचारानं फुगलेली त्यांची ढेरपोट फोडायला नीतीमत्तेची सुरी कुचकामी तर आहेच पण लाचारीनं लथपथलेली यांची थोबाड झोडायला षंढ संस्कृतीची हत्यारही बोथट झालिएत या बगळ्यांनो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा हा देश आपुल्या ‘बा’चा समजा भारत माता की जय! समाजवादी समाजरचना झिंदाबाद! भारतीय लोकशाहीचा इजय असो!

मुकुंद शिंत्रे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची