Loading ...
/* Dont copy */

माझा जन्मदिन - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मुकुंद शिंत्रे (मुकुंद मोरेश्वर शिंत्रे) यांची माझा जन्मदिन ही लोकप्रिय मराठी कविता.

माझा जन्मदिन - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

क्रांतीदिनापूर्वीचा ‘ढसाळी दिन’ माझा जन्मदिन, दि. ३० एप्रिल १९६२, मु. पो. पुणे, ससून हॉस्पीटल...

माझा जन्मदिन

मुकुंद शिंत्रे (कवितासंग्रह:एक बामण ढसाळलेला । नाशिक, महाराष्ट्र)

क्रांतीदिनापूर्वीचा ‘ढसाळी दिन’ माझा जन्मदिन दि. ३० एप्रिल १९६२ मु. पो. पुणे, ससून हॉस्पीटल जनरल वार्ड, वेळ ३ वाजून ५४ मिनिटे सुस्तावणारी एक सुन्न दुपार - आत्मा - अनात्म्यात दंगल माजली म्हणून थरथरली - भयचकीतून भुतळी प्रवेशणाऱ्या बेफाम आत्म्याची वाट बघत आवेगांसह समाधिस्त होऊन थांबली बहुधा चित्रागुप्ताचे All Assistants बेवडा पेऊन तर्रऽऽ असावेत पगारवाढ व्हावी म्हणून बैठा संप घडवित असावेत किंवा चित्रगुप्तानेच टाळेबंदी डिक्लेअर केली असेल त्याच्या डाव्या कपाटात, अतीडाव्या खणात वास्तवणाऱ्या कम्युनिस्टी आत्म्याने गर्जुन चित्रगुप्ताला गचांडी दिली बेधुंद बेफाट होत त्याने साऱ्यांना मुक्तीची हाक दिली जन्ममृत्यूच्या नोंदबुका - पापपुण्याच्या एंट्रीज जर्नल्स क्षणार्धात त्याने पेट्रोल टाकून चेटवून दिल्या स्वलोकीचे ‘क्लीअरींग हाऊस’ पळापळीत गुंगून गेले अंधारल्या गर्भाशयीच्या कारागृहात एक अनाम बेबंद बेफाट आत्म्याने दलित क्रांती झिंदाबाद ची घोषणा दिली अंतराळी भ्रमणारा भीमात्मा सुखावला ‘आगे बढो’ आशिर्वादून पुढे निघाला पुण्यपतनस्थ नगरीत प्रवेशु इच्छिणाऱ्या अनंत सोवळेखानी भटाळ आत्म्यांनी गुलाबी पितांबरी पाचुंदाभर कुल्हे थयथयवून ‘वेद प्रामाण्याचा’ अनिर्बंध नंगानाच घातला वेद गीता पुराणे इत्यादींची तमा न बाळगणाऱ्या ढसाळलेल्या एका भटाळ आत्म्याला ताळ्यात आणण्याचा निष्प्राण, निष्प्रेम प्रयत्न केला त्याचवेळी मनूच्या अवलादींनी बांधलेली संस्कृती बाग शिलगाऊन - भडकावण्याचा मी निश्चय केला गर्भकारागृहाच्या नाजूक भिंती माझ्या बेलाग घोषणेने ठण्ण खणाणल्या रुपेरी साखळदंडी जंजीरबेडी छनाऊन लिलये हातांवर पेलून मँडेला व्हायची मी स्वतःच स्वतःला किंकाळून जाग दिली सुरकुतलेले, पछाडलेले, पिसाळलेले, गोंधळलेले असंख्य अवतरणी मनुमात्म्यांनी भुंडाळलेले होऊन संस्कृतीची मेहेरनजर राखायला सांगितली निःशब्द गंभीर आनंद मुद्रेने साखळदंड उडवित मी क्रांतीची बांग दिली ‘संस्कृतीच्या षंढछाप कस्तुरी भाटांनो तुम्ही कहीही करा, कितीही कोकला तुमच्या संस्कृतीचं हवाई धरण आता पुरेपूर फुटणार आहे उसळणार आहे, कोसळणार आहे कारण आपल्याच धर्मात आता वॅगनभारुन ‘ढसाळ’ जन्म घेणारेत सलामी माझी झडली आहे विवेकाची झोप मोडली आहे सांभाळून असा! कित्येक मागून येताहेत। मी तर केवळ नांदीची एक रुपरेखा।’

मुकुंद शिंत्रे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची