Loading ...
/* Dont copy */

काळानुसार जग बदललं - स्फुटलेखन (तेजश्री कांबळे-शिंदे)

काळानुसार जग बदललं (स्फुटलेखन) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिका तेजश्री कांबळे-शिंदे यांचे काळानुसार जग बदललं हे स्फुटलेखन.

काळानुसार जग बदललं - स्फुटलेखन (तेजश्री कांबळे-शिंदे)

खरंच लहानपणीचे दिवस पुन्हा यावे...


काळानुसार जग बदललं - स्फुटलेखन (तेजश्री कांबळे-शिंदे)

मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिकातेजश्री कांबळे-शिंदे’ यांचे ‘काळानुसार जग बदललं’ हे स्फुटलेखन.



खूप आठवतात काही लहानपणीच्या गोष्टी. आज काळ बदलला, लहानपणी खूप गोष्टीत मन रमले होते. शाळेजवळच्या दुकानात चिंचा, बोरं, बोरकुट ह्या सारख्या गोष्टी खूप मिळायच्या.

शाळा सुटली कि दुकानात जाऊन उभं राहायचं ओऽऽऽकाका मला द्याना लवकर, मित्र बोलायचे आधी मला काका? ह्या वरून पण आमची भांडणं. त्यात मजाच वेगळी.

तसेच घरी गेल्यावर सायकल भाड्याने घेऊन २ रुपयाला अर्धा तास भेटायची, आई कडून पैसे घेऊन अर्धा तासात सायकल चालून घरी. एखादं वाहन मला चालवता येतं हीच मोठी गोष्टी वाटायची. खोखो यासारखे खेळ असायचे. खूप आठवणीत मन रमून जायचे.

काळानुसार जग बदललं. आता लहान मुले या सारख्या गोष्टीनं मध्ये आनंद पाहतच नाही, आता मोबाईल शिवाय काहीच आयुष्य नाही असं झाले आहे. लहान मुले अभ्यासा पासून सगळं गोष्टी मोबाईल मध्ये पाहतात.

ऑनलाईन गेम खेळणं, गेम मुळे होणारे त्रास, आत्महत्या या सारखी गोष्टी होतात. त्यांना खेळात आनंद मिळणे गरजेचं आहे. खरंच लहानपणीचे दिवस पुन्हा यावे. लहानपणीचे खेळ, ते चमचमीत खाणं या सारख्या गोष्टी खूप आठवतात खरचं...

म्हणून म्हणतात संत तुकाराम महाराज -

लहानपण देगा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥

ऐरावत रत्न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ॥

ज्याचे अंगी मोठेपणा ।
तया यातना कठीण ॥

तुका म्हणे जाण ।
व्हावे लहानाहूनि लहान ॥


काळानुसार जग बदललं यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- तेजश्री कांबळे-शिंदे

अभिप्राय

  1. غير معرف29 يونيو, 2024

    👌👌

    ردحذف
  2. غير معرف29 يونيو, 2024

    खूप खूप सुंदर लिखाण 😌 कधी न विसरता येणाऱ्या आणि हल्लीच्या दिवसात कोणालाही न अभुवता येणाऱ्या गोष्टी ☺️❤️
    - तनुजा जाधव

    ردحذف
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची