Loading ...
/* Dont copy */

आम्ही तिघे भाऊ - मराठी कविता (संजय उपाध्ये)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संजय उपाध्ये यांची आम्ही तिघे भाऊ ही लोकप्रिय मराठी कविता.

आम्ही तिघे भाऊ - मराठी कविता (संजय उपाध्ये)

आम्ही तिघे भाऊ, एका खांबावर राहू


आम्ही तिघे भाऊ - मराठी कविता (संजय उपाध्ये)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संजय उपाध्ये यांची आम्ही तिघे भाऊ ही लोकप्रिय मराठी कविता.



आम्ही तिघे भाऊ, एका खांबावर राहू
खांबावरनं वाहनांची गंमत आम्ही पाहू

मी मोठा भाऊ, रंग आहे लाल माझा
रस्त्यावर असतो मी एकमेव राजा
मला पाहून रस्त्यावर थांबतात गाड्या
माझ्यापुढे चालत नाहीत वाहनांच्या खोड्या
मी जाताच वाहनांचे ताफे लागतात धावू

मी धाकटा भाऊ, माझा रंग आहे हिरवा
मी सांगे सगळ्यांना चला जावा धावा
मला पाहून रस्त्यावर वाहनांची ये जा
मोठा भाऊ लगेच म्हणे आता नंबर माझा
सांगा त्याची आज्ञा मोडून कसा पुढे जाऊ

मी मधला भाऊ, माझा रंग आहे पिवळा
रस्त्यावरचे सगळे लोक मला म्हणती बावळा
मोठ्याचे ऐकले मी तर गाड्यान धावती
धाकट्याचे ऐकले मी तर गाड्यान थांबती
कळत नाही मला मी कुणाची बाजू घेऊ

- संजय उपाध्ये

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची