Loading ...
/* Dont copy */

वृक्षारोपण: पर्यावरणाचे हरित स्वप्न - मराठी कविता (कपिल गऊल)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी कपिल गऊल यांची प्रबोधनात्मक वृक्षारोपण : पर्यावरणाचे हरित स्वप्न ही मराठी कविता.

वृक्षारोपण : पर्यावरणाचे हरित स्वप्न - मराठी कविता (कपिल गऊल)

सामूहिक प्रयत्नांतून पर्यावरण संवर्धनाची प्रबोधनात्मक हाक... पर्यावरणाचे हरित स्वप्न

वृक्षारोपण : पर्यावरणाचे हरित स्वप्न

कपिल गऊल (संगमनेर, महाराष्ट्र)

ही कविता वृक्षारोपणाच्या उपक्रमातून घडणाऱ्या सामूहिक जागृतीचे चित्र रंगवते. एका छोट्या गटाने केलेली सुरुवात शेकडोंच्या सहभागाने मोठ्या चळवळीत रूपांतरित होते. रोपे, खत, श्रमदान अशा विविध योगदानातून निसर्गप्रेम मनामनांत रुजते. समाजमाध्यमांचे समर्थन मिळाल्याने ही चळवळ अधिक व्यापक होते. कविता संदेश देते की वृक्षारोपण म्हणजे फक्त रोपे लावणे नसून निसर्गसंतुलन साधण्यासाठी आणि पुढील पिढ्यांचे संगोपन करण्यासाठी आवश्यक अशी सामूहिक जबाबदारी आहे.

आली एक कल्पना अध्यक्षांच्या मनी पर्यावरणमित्र ग्रुप तयार केला त्यांनी एकत्र केले सर्व निसर्गमित्र केले अहवान वृक्षारोपणाचे बदलण्यास चित्र जमविले रोप, टिकाव, टोपली अन फावडे मागविल्या सूचना, घेतले आराखडे जमत गेले मित्र आणखीन ३० वरून झाले ३०० होतील ३०००+ आणखीन दाद देत आणले कोणी सेंद्रीय खत रुजविला अंकुर त्यांनी जमिनीत आणि मनात होईल मोठे बगीचे गाव शिवारात प्रतिसाद पाहून कार्याला आणखी हुरूप आला मना मनातील पर्यावरणप्रेमी जागा झाला कोणी केल अर्थ तर कोणी श्रमदान केलं वृक्षारोपण विचाराचे चळवळीत रूपांतरण झालं पाहता पाहता बातमी वाऱ्या सारखी पसरली आणखी काही ठिकाणी फळबाग बहरली दिले समाजमाध्यमांनी समर्थन केले कौतुक अन् केले समाज प्रबोधन जर केले आपणही सर्वांनी मिळून प्रयत्न, करून कामना मंगल तर साकारेल शहरातही जैवविविध जंगल करावे सर्वांनी वृक्षारोपण साधेल निसर्ग संतुलन अन् पुढच्या पिढीचे होईल संगोपन

कपिल गऊल यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची