Loading ...
/* Dont copy */

ईद एकतेची - मराठी कविता (आकाश पवार)

ईद एकतेची (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी आकाश पवार यांची ईद एकतेची (Eid Ekatechi Marathi Kavita) ही मराठी कविता.

ईद एकतेची - मराठी कविता (आकाश पवार)

आज ईद आहे, आनंद साजरा, सौहार्दाचा घडू देवाणघेवाण... ईद एकतेची

ईद एकतेची

आकाश पवार (शिराढोण, कळंब, धाराशिव)

द्वेषाच्या या ज्वाळा पेटल्या, जिहादच्या नावाखाली, निरपराधांच्या आसवांनी, जमिनीही आता भिजली. हिंसा आणि अत्याचारांनी, मानवी मूल्ये हरवली, भेदभावाच्या या गर्तेत, माणुसकीही मरण पावली. पण आम्ही हिंदू, आम्ही सहिष्णु, आम्ही प्रेमाचे पूजारी, शांतीचा हा दीप पेटवू, नको रक्ताचे विकार भारी. आज ईद आहे, आनंद साजरा, सौहार्दाचा घडू देवाणघेवाण, ताटातली शिरखुर्मा गोड राहू दे, नको विषारी कट कारस्थान. राजकारणी फक्त येतात, मतांसाठी रंग खेळतात, प्रेमाच्या या नाटकांत, दंगलींचे बीज पेरतात. पण आम्ही ना भुलणार, ना दंगलींच्या खेळात पडणार, एकतेचा मंत्र जपत, शांततेचा मार्ग धरणार. तुम्हीही विचार करा, रक्ताच्या या साकड्याला, खऱ्या इस्लामात शांतीच सांगितली, हिंसेला कसलं नाव दिलं? आजही उभा आहे आकाश, माणुसकीचा नवा सूर्य होऊन, प्रेमाची कविता लिहितोय, वैरभावाचे पान फाडून. “ईद मुबारक!” हेच आमचे उत्तर, द्वेषाने जिंकू शकणार नाही, कारण प्रेमाच्या या दुनियेत, नफरत टिकणार नाही.

आकाश पवार यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची