Loading ...
/* Dont copy */

बायको - मराठी कविता

बायको (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री विद्या कुडवे यांची बायको ही मराठी कविता (Baayko - Marathi Kavita).

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको... बायको... बायको... म्हणजे कोण असते?


बायको (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्रीविद्या कुडवे’ यांची ‘बायको’ ही मराठी कविता.



बायको... बायको... बायको... म्हणजे कोण असते?
एक मुलगी स्वतःचे सर्व काही सोडून अगदी आडनावापासून
ते कधी कधी नाव ही विसरून दुसर्‍यांची होते
कोणा एका व्यक्तीसाठी तिने आपले सर्वस्व सोडून
त्या व्यक्तीच्या परिवाराला आपलं म्हणणं
...आणि आपल्या जन्मापासून असलेल्या नात्यांना विसरावं

सगळ्यांचं सगळंच करावं आणि स्वभावही सांभाळून घ्यावे
पण तिला कधी काय वाटतं ते सांगू नये
तिने नोकरी करावी, का तर आजकाल सगळेच करतात
पण तिने नोकरी करत घर ही सांभाळावं
मग कधी चुकून, चुकी झाली तर तिला स्पष्टपणे सांगावं
तू चुकतेस !
घराकडे लक्ष नाही आहे तुझं

तरी दुसर्‍याच क्षणी काही झालं नाही म्हणून पुन्हा
नव्या उमेदीने तिने सगळ्यांचं सगळं करावं
आयुष्याच्या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये आपण एकमेकांसाठी आहोत
पण या नात्यांमध्ये ती एकटीच असते, साथीदार मात्र नसतो
वर्षामागे वर्षे जातात पण तिने कधी कोणासाठी कमी पडायचे नाही

मग ती एक सुन म्हणून
एक बायको म्हणून
एक वहिनी म्हणून
एक आई म्हणून
एवढ्या वर्षानंतर आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनवर आलो तरी
ज्याच्यासाठी स्वतःला विसरून त्याची झाले; पण तो विचारतो
तू कोण आहे ? मी आहे म्हणून तू आहेस !
मी नसतो तर तुला कोणी विचारले नसते !
पण तरी त्याचा राग न करता त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी
त्याला माझी गरज याची जाणीव असणारी म्हणजे बायको नाही कां?

- विद्या कुडवे

अभिप्राय

  1. खरंखुरं बायकाेचि हिच तरंहा आहे.

    ردحذف
  2. Thank you so much i hope you guys love this will come with another good thinks

    ردحذف
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची