Loading ...
/* Dont copy */

शिक्षक म्हणजे - मराठी कविता (संतोष सेलुकर)

शिक्षक म्हणजे (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी संतोष सेलुकर यांची शिक्षक म्हणजे ही मराठी कविता.

शिक्षक म्हणजे - मराठी कविता (संतोष सेलुकर)

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो, ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे, ज्ञानाची पानं...

शिक्षक म्हणजे

संतोष सेलुकर (परभणी, महाराष्ट्र)

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या अस्फुट चित्कारांना किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी लटकेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची निरागस अक्षरे शिक्षक नसतो कधीच बिचारा तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा त्याच्याच स्वमीत्वाने महत्व येत असते शाळेला तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ नखशिखान्त अंधर भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून सूर्याचं तेज बाहेर काढणारा तो समाज सुधारक क्रांतीकारकही तोच कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे शिक्षकाला जपावी लागतात कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड आणि आकार द्यावा लागतो एका मुक्त पणे बागडणाऱ्या निराकार चैत्यनाला... कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत निर्ममपणे... कधी अंधार ही प्यावा लागतो बोनबोभाट पणे तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर त्याच्या सोबतील असतेच की खडूची धारदार तलवार अन् फळ्याची ढाल असते पाठीशी विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल. अन तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल

संतोष सेलुकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. غير معرف28 نوفمبر, 2020

    अगदिच सोप्या आणि सरळ शब्दांत शिक्षक म्हणजे काय हे मांडले आहे.
    संतोष सेलुकर सर तुमची कविता आवडली.

    ردحذف
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची