Loading ...
/* Dont copy */

लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज ऐकून अशोक सराफ गहिवरले

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज ऐकून गहिवरले.

लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज ऐकून अशोक सराफ गहिवरले

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा होणार सन्मान

खास प्रसंगी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आभासी फोनने सारेच गहिवरले...

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. प्रवाह परिवाराच्या या दिमाखदार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या अशोक मामांच्या सन्मानासाठी महेश कोठारे, निवेदिता सराफ, वर्षा उसगांवकर, निशिगंधा वाड, किशोरी अंबिये आणि संपूर्ण सराफ कुटुंब उपस्थित होतं. या खास प्रसंगी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची उणीव सर्वांनाच भासत होती. त्याच क्षणी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आभासी फोन आला आणि सारेच गहिवरले. या आभासी फोनमधला संवाद काहीसा असा होता.

हॅलो.. हॅलो...अशोक. धनंजय माने इथेच रहातात का? धनंजय माने फक्त इथे रहात नाहीत तर ते इथे राज्य करतात. अरे आपण जवळपास ५० चित्रपट एकत्र केले. तुझ्यासारखा ॲक्शन आणि रिॲक्शन देणारा दुसरा कलाकार मी माझ्या कारकीर्दीत तरी नाही बघितला. तुझा आज होणारा सन्मान बघून डोळे भरुन आले बघ. आपला मित्र आज एवढ्या उंचीवर पोहोचला हे ऐकून आणि बघून आनंदाने उर भरुन आला. लोकं आकाशात तारे बघतात. मी आकाशातून जमिनीवरचा अशोक नावाचा तारा रोज बघत असतो.

तुझ्यासारखा अभिनेता, सच्चा माणूस आणि दिलदार मित्र कुणी नाही. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहिल. अशोक, माफ कर हं...एवढ्या वर्षांची सवय आहे अशोक म्हणायची. पण आता तू फक्त अशोक राहिला नाही आहेस. पद्मश्री, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ झाला आहेस. अशोक आज तू घरी जाताना पाऊस पडलाना तर तुझ्या गाडीची काच खाली करुन हात बाहेर काढ. हातावर पाण्याचे थेंब पडले तर ते माझे आनंदाश्रू आहेत असं समज. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तूला खूप खूप शुभेच्छा अशोक. येतो...

लेखक चिन्मय कुलकर्णी आणि मोहित कुंटेच्या लेखणीतून हा हळवा क्षण रेखाटण्यात आला आहे. या हळव्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नक्की पहा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ येत्या रविवारी म्हणजेच १६ मार्चला सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

अभिप्राय

  1. غير معرف18 مايو, 2023

    tumchya chitranvarun spasht hot ahe tumhi purnpane congress swadhin ahat . tumhi neutral asayala have hote . baki tumche chitr chhan ahet pan tumhi khup sarya mahtvachya muddyankade kanadola kela ahe

    ردحذف
    الردود
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि आपल्या विचारांचा आम्ही आदर करतो.

      حذف
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची