Loading ...
/* Dont copy */

कोकणी मसाला - पाककृती

कोकणी मसाल्याची पाककृती - [Konkani Masala Recipe] महाराष्ट्रातील सर्वाधिक निसर्ग संपन्न अशा कोकणातील ‘कोकणी मसाला’ हा विश्वविख्यात आहेच शिवाय काही प्रमुख भारतीय मसाल्यांतील हा एक लोकप्रिय चवीचा मसाला म्हणूनही ओळखला जातो. कोकणी मसाला हा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोनही प्रकारच्या व्यंजनांसाठी वापरला जातो.

कोकणी मसाला - पाककृती | Konkani Masala - Recipe

शाकाहारी आणि विशेष करून मांसाहारी व्यंजनांमध्ये कोकणी मसाला वापरल्यास व्यंजनांस रंग आणि चव दोन्ही उत्तम येतात

‘कोकणी मसाला’साठी लागणारा जिन्नस
  • १/४ किलो सुक्या लाल मिरच्या
  • १/४ किलो धणे
  • १० ग्रॅम लवंग
  • १० ग्रॅम जीरे
  • १० ग्रॅम काळे मिरे
  • १० ग्रॅम मोहरी
  • १० ग्रॅम दलचिनी
  • १० ग्रॅम जायपत्री
  • १० ग्रॅम शहाजिरे
  • १० ग्रॅम मेथीदाणे
  • अर्धा वाटी खसखस
  • १/२ जायफळ
  • २५ ग्रॅम बडीशेप
‘कोकणी मसाला’ची पाककृती
  • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
  • सर्व साहित्य कोरडेच भाजून घ्या.
  • भाजून झाल्यावर बाजूला थंड करायला ठेवा.
  • थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्या.
  • तयार कोकणी मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.



हेमा चिटगोपकर | Hema Chitgopkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
पाककला या विभागात लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची