मनाचे श्लोक - श्लोक ९

मनाचे श्लोक - श्लोक ९ - [Manache Shlok - Shlok 9] नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे, अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे.

मनाचे श्लोक - श्लोक ९ | Manache Shlok - Shlok 9

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या एकुन २०५ मनाचे श्लोक या मानवी मनास मार्गदर्शन करणाऱ्या पद्य स्वरूपाच्या श्लोक मालिकेतील श्लोक ९, नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे, अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे

मनाचे श्लोक - श्लोक ९
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥
- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)
मन: पूर्वजानां धनं मा चिनु त्व ।
मतिस्वार्थधी: शिष्यतेत्रातिपापा ॥
सदा पापजन्यं फलं भोग्यमेव ।
यदा नेप्सिताप्तिस्दता दु:खमेव ॥९॥

मनाचे श्लोक - श्लोक ९ - अर्थ
इथे समर्थ मनाला शिकवण देत आहेत की हे मना, वाड-वडिलांनी अती कष्टाने मिळवलेली संपत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्याचा विचारही करु नकोस. त्यापेक्षा स्वतःच्या बळावर व स्वतःच्या पुरुषार्थाने संपत्ती मिळवून जर उदर निर्वाह चालवला, तर जीवन सार्थकी ठरते.

स्वार्थ म्हणजे स्वतःसाठीच सर्व काही करणे, मिळवणे. मनाला मुळातच परमार्थाची आवड नसल्याने ते बाह्य जगतात सतत भटकत असते. यामुळे दिसेल त्या गोष्टीस ते चिकटून त्याची आसक्ती निर्माण करते. आणि एकदा का एखाद्या गोष्टीची आसक्ती निर्माण झाली की, मन सतत त्याच्याच चिंतनात मग्न राहते आणि अजून-अजून मिळत रहावं असं सारखं वाटत राहतं. या वाटण्यामुळे मन मनुष्याला वाम मार्गावरुनही जाण्यास प्रवृत्त करते. तीच ही पापबुद्धी. त्यामुळे मनाची सगळी शक्ती ‘बाहेर’ प्रवाहित होते. वाईट विचार तर मनात सारखे चालूच असतात. चांगले विचार करायला मात्र विशेष शक्तिची गरज पडते. स्वार्थाचा एक साधा विचार सुद्धा माणसाला वाईट कर्मे करायला भाग पाडतो. आणि जितकी वाईट कर्मे, तितकी किंवा त्याहीपेक्षा जास्त चित्तामध्ये मलिनता. मग कधी आणि कसे होणार रामचिंतन/आत्मचिंतन ? रामचिंतन जर घडलेच नाही तर शेवटी माणसाची ‘जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला’ अशी अवस्था होते. स्वार्थबुद्धी परमार्थ करायला लावत नाही आणि चालू असलेला परमार्थ बिघडवते. म्हणून समर्थ मनाला ही स्वार्थबुद्धी त्यागायला सांगत आहेत की जेणेकरुन पापाचा संचय वाढणार नाही आणि पर्यायाने रामचिंतन घडून एक दिवस शुद्ध पुण्य उदयास येऊन जीवन कृतकृत्य होईल.

जसे कर्म तसे फळ, हा निसर्गाचा नियमच आहे. आजतागायत तो कोणीही टाळू शकलेला नाही. स्वार्थ म्हणजे नकारात्मक ‘स्व’ आणि जिकडे हा ‘स्व’ आला, तिकडे पापकर्मे घडणारच. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी त्याबद्दल फार छान सांगितलं आहे.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात:
ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते । संगात्संजायते कामः
कामात्क्रोधोऽभिजायते । क्रोधाद्भवतिसंमोहः संमोहात्स्मृति विभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो
बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥

या श्लोकाचा अर्थ
विषयांचं चिंतन घडत असल्यावर त्यांच्या प्रती सूप्त असलेली आसक्ती जागृत होते. आसक्ती जागृत झाल्यावर मनात काम निर्माण होतो. काम निर्माण झाल्यावर तो समुद्राच्या लाटांसारखा उफाळून वर येतो. कामाची तृप्तता जर झाली नाही तर क्रोध निर्माण होतो. क्रोध निर्माण झाल्यावर स्मृतिभ्रंश होतो आणि त्यामुळे बुद्धी भ्रष्ट होऊन मानवाचा नाश होतो. ज्या कर्मांमुळे बुद्धिचा नाश होऊन पापसंचय वाढतो, त्या कर्मांत सत्यता म्हणजे शुद्धता कशी असणार ? म्हणजे अशा प्रकारची सर्व कर्मे ही खोटीच समजावी.

तात्पर्य: स्वार्थबुद्धी ठेवल्याने माणूस नेहमी असमाधानीच राहतो. असमाधान म्हणजे मनासारखे न होणे. मनासारखे झाले नाही तर फार दुःख होते. म्हणून समर्थ मनाला स्वार्थबुद्धी नष्ट करण्याचा उपदेश करत आहेत.

अभिप्राय

नाव

अजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,123,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,39,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,43,उदय दुदवडकर,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,3,कपील घोलप,2,करमणूक,31,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,18,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,54,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,4,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,29,दिनविशेष,7,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,7,नोव्हेंबर,5,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,8,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,19,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,6,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,12,मराठी कथा,19,मराठी कविता,90,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,18,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,10,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,53,मसाले,2,महाराष्ट्र,18,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,43,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,15,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,10,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,125,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,6,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,5,संस्कृती,11,सचिन पोटे,2,सण-उत्सव,5,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,10,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,12,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: मनाचे श्लोक - श्लोक ९
मनाचे श्लोक - श्लोक ९
मनाचे श्लोक - श्लोक ९ - [Manache Shlok - Shlok 9] नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे, अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे.
https://2.bp.blogspot.com/-E-JjHxII744/W1Lk8XOfCTI/AAAAAAAAA3E/ZvxwXk3-mkgrYUikzqeAajWeYQ7X3ybxQCLcBGAs/s1600/manache-shlok-9.png
https://2.bp.blogspot.com/-E-JjHxII744/W1Lk8XOfCTI/AAAAAAAAA3E/ZvxwXk3-mkgrYUikzqeAajWeYQ7X3ybxQCLcBGAs/s72-c/manache-shlok-9.png
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/09/manache-shlok-9.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/09/manache-shlok-9.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy