मनाचे श्लोक - श्लोक १०

मनाचे श्लोक - श्लोक १० - [Manache Shlok - Shlok 10] सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी, सुखाची स्वयें सांडि जीवी करावी.

मनाचे श्लोक - श्लोक १० | Manache Shlok - Shlok 10

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या एकुन २०५ मनाचे श्लोक या मानवी मनास मार्गदर्शन करणाऱ्या पद्य स्वरूपाच्या श्लोक मालिकेतील श्लोक १०, सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी, सुखाची स्वयें सांडि जीवी करावी

मनाचे श्लोक - श्लोक १०
सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी ।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी ॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥
- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)
मनो रामचंद्रे तव प्रीतिरस्तु ।
बलाध्दद्रतं दु:खजालं निर्वाय ॥
त्वया देहदु:खं सुखत्वेन मान्यं ।
रमस्वात्मरुपे विचरेण नित्यम्‌ ॥१०॥

मनाचे श्लोक - श्लोक १० - अर्थ
येथे श्रीसमर्थांना असं सांगायचं आहे की, श्रीरामाचे इतके अखंड स्मरण करावे, त्याच्यावर इतके प्रेम करावे की ते स्मरण कालांतराने ‘आपोआप’ होऊन भोगत असलेल्या सर्व दुःखांचा आपल्याला पूर्ण विसरच पडला पाहिजे. सदा सर्वदा श्रीरामाच्याच स्मरणात आपण लीन राहिले पाहिजे.

सांडून आपली संसारवेथा । करित जावी देवाची चिंता । निरुपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्या चि सांगाव्या ॥
देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी । सर्व अर्पावें सेवटीं । प्राण तोहि वेचावा ॥
आपुलें आवघें चि जावें । परी देवासीं सख्य राहावें । ऐसी प्रीति जिवें भावें । भगवंती लागावी ॥

श्रीरामाच्या स्मरणात लीन राहता राहता आपल्याला दुःखाचा विसरच पडला पाहिजे पण इतकेच नव्हे तर, त्या दुःखातच आपल्याला सुख मानता आले पाहिजे. असे म्हणतात की देहावर कष्टे, संकटे आली की देव आठवतो. तेव्हा ही संकटे, संकटे न वाटून ईश्वरस्मरण करण्यासाठी आलेल्या सुवर्णसंधीच समजाव्या. कारण सुख भोगत असताना कोण कुठला ईश्वर, अशी आपली धारणा बनलेली असते. तर दुःखातच सुख कसे मानावे ? तर, जे काही कष्ट, हाल अपेष्टा या देहावर आलेल्या आहेत, त्यातच आपले पूर्ण कल्याण आहे असा सकारात्मक विचार नेहमी केल्यास दुःखाचे विस्मरण लगेच होईल. महाभारतात कुंतीने भगवान श्रीकृष्णांकडे हाच वर मागितला होता. त्या म्हणाल्या की, ‘हे भगवंत, मला आपण नेहमी दुःखातच ठेवा. तसे झाल्यास मला आपले स्मरण अखंडपणे होईल’. “आपदः सन्तु नः शश्वत्” हा कुंतीने मागितलेला वर सर्वश्रूतच आहे.

प्रत्येक ठिकाणी समर्थांनी त्यांच्या सर्व साहित्यांमध्ये ‘विवेकबुद्धी’ जागृत ठेवून कसे जगावे, हे दर्शवून त्याला अत्यंत महत्त्व दिले आहे. आपले खरे स्वरुप म्हणजे हा नश्वर देह नसून, निर्मळ चैतन्य हेच आहे. चैतन्य म्हणजे देहात ‘आपोआप’ चालत असलेला श्वासोच्छवास. तो प्राणरुप श्वासोच्छवास म्हणजेच राम, तोच आत्मा, तोच जगदात्मा, तोच परमात्मा आणि तेच निर्गुण ब्रह्म ! त्याला आपल्या भक्तिप्रमाणे नाव कोणतेही द्या. पण त्यालाच समर्थांनी ‘सस्वरुपी’ म्हटले आहे. जो पर्यंत आपण आपल्या सस्वरुपात लीन राहण्याचा प्रयत्न करत नाही, तो पर्यंत विवेक जागृती कधीही होत नाही. सस्वरुप हाच ईश्वर असल्याने त्याच्यात लीन राहताना, काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणही तोच देतो.

या विचाराच्या योगाने:
या चि जन्में येणें चि काळ । संसारी होईजे निराळें । मोक्ष पाविजे निश्चळें । स्वरुपाकारें ॥
सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप । सस्वरुप म्हणिजे आपलें रुप । आपलें रुप म्हणिजे अरुप । तत्व निर्शनाउपरी ॥

त्या स्वरुपाच्या ठिकाणी समर्थ म्हणतात:
शिष्या येकांती बैसावें ।
स्वरुपीं विश्रांतीस जावें ।
तेणें गुणें दृढावे ।
परमार्थ हा ॥

अभिप्राय

नाव

अजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,122,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,32,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,37,उदय दुदवडकर,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,1,कपील घोलप,2,करमणूक,30,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी काहीतरी,2,केदार कुबडे,18,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,48,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,4,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,24,दिनविशेष,2,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,7,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,8,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,18,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,6,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,11,मराठी कथा,19,मराठी कविता,89,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,17,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,10,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,42,मसाले,2,महाराष्ट्र,17,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,37,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,14,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,9,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,122,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,4,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,3,संपादकीय व्यंगचित्रे,3,संस्कृती,10,सचिन पोटे,2,सण-उत्सव,4,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,9,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,11,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: मनाचे श्लोक - श्लोक १०
मनाचे श्लोक - श्लोक १०
मनाचे श्लोक - श्लोक १० - [Manache Shlok - Shlok 10] सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी, सुखाची स्वयें सांडि जीवी करावी.
https://1.bp.blogspot.com/-DH4V-VqEnQI/W1LlBO1yGhI/AAAAAAAAA3M/4F_uo8kBLbQ_GPl6U3-worG0RXAD8qojQCLcBGAs/s1600/manache-shlok-10.png
https://1.bp.blogspot.com/-DH4V-VqEnQI/W1LlBO1yGhI/AAAAAAAAA3M/4F_uo8kBLbQ_GPl6U3-worG0RXAD8qojQCLcBGAs/s72-c/manache-shlok-10.png
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/09/manache-shlok-10.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/09/manache-shlok-10.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy