तुकाराम गाथा - अभंग ९०

प्रकाशन: संपादक मंडळ | १२ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ९० | Tukaram Gatha - Abhang 90

तुकाराम गाथा अभंग ९० - [Tukaram Gatha - Abhang 90] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

तीळ जाळिले तांदुळ ।
काम क्रोधे तैसेचि खळ ॥१॥

कां रे सिणलासी वाउगा ।
न भजतां पांडुरंगा ॥ध्रु॥

मानदंभासाठीं ।
केली अक्षरांची आटी ॥२॥

तप करूनि तीर्थाटन ।
वाढविला अभिमान ॥३॥

वांटिलें तें धन ।
केली अहंता जतन ॥४॥

तुका म्हणे चुकलें वर्म ।
केला अवघाचि अधर्म ॥५॥संत तुकाराम महाराज