तुकाराम गाथा - अभंग ८९

प्रकाशन: संपादक मंडळ | ११ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८९ | Tukaram Gatha - Abhang 89

तुकाराम गाथा अभंग ८९ - [Tukaram Gatha - Abhang 89] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

बोलायाचा त्यासीं ।
नको संबंध मानसीं ॥१॥

जया घडली संतनिंदा ।
तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु॥

जळो त्याचें तोंड ।
नको दृष्टीपुढें भांड ॥२॥

तुका म्हणे देवा ।
तया दुरी मज ठेवा ॥३॥संत तुकाराम महाराज