तुकाराम गाथा - अभंग ८८

प्रकाशन: संपादक मंडळ | १० सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८८ | Tukaram Gatha - Abhang 88

तुकाराम गाथा अभंग ८८ - [Tukaram Gatha - Abhang 88] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

सुख पाहतां जवापाडें ।
दुःख पर्वता एवढें ॥१॥

धरीं धरीं आठवण ।
मानीं संताचें वचन ॥ध्रु॥

नेलें रात्रीनें तें अर्धें ।
बाळपण जराव्याधें ॥२॥

तुका म्हणे पुढा ।
घाणा जुंती जसी मूढा ॥३॥संत तुकाराम महाराज