तुकाराम गाथा - अभंग ८७

प्रकाशन: संपादक मंडळ | ९ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८७ | Tukaram Gatha - Abhang 87

तुकाराम गाथा अभंग ८७ - [Tukaram Gatha - Abhang 87] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार ।
एकाचें उत्तर एका न ये ॥१॥

तैसें मज नको करूं कमळापति ।
देई या संगति सज्जनांची ॥ध्रु॥

तिनें पाचारिलें इल बा म्हणोन ।
येरु पळे आण जाली आतां ॥२॥

तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न ।
तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥संत तुकाराम महाराज