तुकाराम गाथा - अभंग ८६

प्रकाशन: संपादक मंडळ | ८ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८६ | Tukaram Gatha - Abhang 86

तुकाराम गाथा अभंग ८६ - [Tukaram Gatha - Abhang 86] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मैत्र केले महा बळी ।
कामा न येती अंतकाळीं ॥१॥

आधीं घे रे रामनाम ।
सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु॥

नाहीं तरी यम ।
दांत खातो करकरा ॥२॥

धन मेळविलें कोडी ।
काळ घेतल्या न सोडी ॥३॥

कामा न ये हा परिवार ।
सैन्य लोक बहु फार ॥४॥

तंववरि मिरविसी बळ ।
जंव आला नाहीं काळ ॥५॥

तुका म्हणे बापा ।
चुकवीं चौर्‍याशींच्या खेपा ॥६॥संत तुकाराम महाराज