तुकाराम गाथा - अभंग ८५

प्रकाशन: संपादक मंडळ | ७ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८५ | Tukaram Gatha - Abhang 85

तुकाराम गाथा अभंग ८५ - [Tukaram Gatha - Abhang 85] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

वळितें जें गाई ।
त्यासि फार लागे काई ॥१॥

निवे भावाच्या उत्तरीं ।
भलते एके धणी वरी ॥ध्रु॥

न लगती प्रकार ।
कांहीं मानाचा आदर ॥२॥

सांडी थोरपणा ।
तुका म्हणे सवें दीना ॥३॥संत तुकाराम महाराज