तुकाराम गाथा - अभंग ८४

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८४ | Tukaram Gatha - Abhang 84

तुकाराम गाथा अभंग ८४ - [Tukaram Gatha - Abhang 84] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

दानें कांपे हात ।
नाव तेविशीं मात ॥१॥

कथी चावटीचे बोल ।
हिंग क्षिरीं मिथ्या फोल ॥ध्रु॥

न वजती पाप ।
तीर्था म्हणे वेचूं काय ॥२॥

तुका म्हणे मनीं नाहीं ।
न ये आकारातें कांहीं ॥३॥संत तुकाराम महाराज