तुकाराम गाथा - अभंग ८२

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८२ | Tukaram Gatha - Abhang 82

तुकाराम गाथा अभंग ८२ - [Tukaram Gatha - Abhang 82] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

न ये नेत्रां जळ ।
नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥

तों हे चावटीचे बोल ।
जन रंजवणें फोल ॥ध्रु॥

न फळे उत्तर ।
नाहीं स्वामी जों सादर ॥२॥

तुका म्हणे भेटी ।
जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥३॥संत तुकाराम महाराज