तुकाराम गाथा - अभंग ८१

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८१ | Tukaram Gatha - Abhang 81

तुकाराम गाथा अभंग ८१ - [Tukaram Gatha - Abhang 81] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

योगाचें तें भाग्य क्षमा ।
आधीं दमा इंद्रियें ॥१॥

अवघीं भाग्यें येती घरा ।
देव सोयरा जालिया ॥ध्रु॥

मिरासीचें म्हूण सेत ।
नाहीं देत पीक उगें ॥२॥

तुका म्हणे उचित जाणां ।
उगीं सिणा काशाला ॥३॥संत तुकाराम महाराज