तुकाराम गाथा - अभंग ८०

प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८० | Tukaram Gatha - Abhang 80

तुकाराम गाथा अभंग ८० - [Tukaram Gatha - Abhang 80] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा ।
नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥

काशासाठीं हात भरूनि धुवावे ।
चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु॥

काय नाहीं देवें करूनि ठेविलें ।
असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥

तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार ।
तेव्हां आपपर बोळविले ॥३॥संत तुकाराम महाराज