तुकाराम गाथा - अभंग ८

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग ८ | Tukaram Gatha - Abhang 8

तुकाराम गाथा अभंग ८ - [Tukaram Gatha - Abhang 8] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा ।
म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥

रात्रंदिस मज पाहिजे जवळी ।
क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥

नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां ।
रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥संत तुकाराम महाराज